झारखंडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फोनवर बोलण्यास नकार दिला म्हणून एका तरुणाने तरुणीला जिवंत जाळले आहे. या घटनेत तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर झारखंडमध्ये तणाव निर्माण झाला आहे. नागरिकांनी रस्त्यावर येत रोष व्यक्त केला तसेच आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. (jharkhand man burned alive girl over one sided love accused arrested by police)
Jharkhand | People protest after a class 12 girl who was set ablaze by a man in Dumka for allegedly turning down his proposal, succumbed to her burn injuries yesterday; Section 144 imposed pic.twitter.com/yXaFlNaaW8 — ANI (@ANI) August 28, 2022
मिळालेल्या माहितीनुसार झारखंडची राजधानी रांचीमध्ये १२ वीत शिकणार्या अंकितावर शाहरुख नावाच्या तरुणाचे प्रेम होते. परंतु अंकिताने शाहरुखला आधीच नकार दिला होता. अंदिता आपल्या आजी आजोबांसोबत राहत होती. तिची घरची परिस्थिती चांगली नव्हती. आर्थिक परिस्थिती चांगली व्हावी म्हणून ती नोकरी शोधत होती. तसेच पदवीपर्यंत शिक्षण घेऊन अंकिताला शिक्षिका व्हायचे होते. परंतु शाहरुख तिला सातत्याने त्रास देत होता. तसेच आपल्यासोबत रिलेशनशिपमध्ये येण्यासाठी तो तिच्यावर दबाव आणत होता, परंतु अंकिता त्याला सातत्याने नकार देत होती.
शाहरुखने कुठुनतरी अंकिताचा मोबाईल नंबर मिळवला. आणि पुन्हा तिला धमकावण्यास सुरूवात केली. तरी अंकिता त्याला विरोध करत होती. एकदा शाहरुखने अंकिताला धमकी दिली तसेच आपले ऐकले नाही तर जिवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर अंकिताने शाहरुखचा फोन उचलणे बंद केले. त्यानंतर शाहरुखच्या तळपायाची आग मस्तकात गेली. २३ ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता शाहरुख अंकिताच्या घरात घुसला आणि तिच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि तिला पेटवून दिले. जेव्हा अंकिताला जाग आली तेव्हा आग चांगलीच पेटली होती. धावत पळत ती अंगणात पोहोचली आणि अंगणातील एका बादलीतील पाणी अंगावर टाकले आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही तिच्या अंगाची लाही लाही होत होती, तेव्हा तिच्या आजी आजोबांनी तिच्या अंगावर घोंगडी टाकली आणि तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
Jharkhand | Mortal remains of the std 12th girl who succumbed to her injuries after being set ablaze by a boy for allegedly turning down his proposal, were taken to cremation ground for her last rites earlier today. — ANI (@ANI) August 29, 2022
Accused Shahrukh was arrested on 23rd August. pic.twitter.com/IDIVSf0cPx
५ दिवस तिच्यावर उपचार सुरू होते परंतु आज अंकिताची मृत्यूसोबतची झुंज अपयशी ठरली आणि तिचा मृत्यू झाला. अंकिताच्या मृत्यूची वार्ता शहरात पसरताच नागरिकांनी रोष व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले. तसेच आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. नातीच्या मृत्यूमुळे आजी आणि आजोबात आतून तुटून पडले आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी अंकिताच्या आजीने केली आहे. अंकिताची आजी म्हणाली की माझे वय जहाले आहे. आरोपीला फाशीची शिक्षा मिळाल्यानंतरच आपल्या आत्म्याला शांती मिळेल असे आजीने म्हटले आहे. अंकिताच्या मृत्यूनंतर रांचीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतली आहे. जेव्हा अंकिताची अंत्ययात्रा निघाली तेव्हा कडक बंदोबस्त होता. या प्रकरणी आरोपी शाहरुखला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल
Gujarat Election: गुजरातमध्ये पुन्हा भाजप सरकार की बदल, काय म्हणतोय...