आज झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार हेमंत सोरेन, शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार?

Jharkhand Hemant Soren swearing-in ceremony : हेमंत सोरेन आज रांचीच्या मोरहाबादी मैदानावर दुपारी 2 वाजता झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

Jharkhand Hemant Soren swearing-in ceremony
आज झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार हेमंत सोरेन, शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार?  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) चे हेमंत सोरेन आज झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
  • शपथविधीचा कार्यक्रम रांचीच्या मोरहाबादी मैदानात दुपारी 2 वाजता होणार आहे.
  • सोरेन यांनी त्यास राज्याच्या नवनिर्मितीचा ठराव दिवस असं म्हटलं आहे.

Hemant Soren swearing in ceremony: झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) चे हेमंत सोरेन आज झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. शपथविधीचा कार्यक्रम रांचीच्या मोरहाबादी मैदानात दुपारी 2 वाजता होणार आहे. सोरेन यांनी त्यास राज्याच्या नवनिर्मितीचा ठराव दिवस असं म्हटलं आहे. सोरेन यांनी प्रसिद्धीपत्रकात राज्यातील सव्वा तीन कोटी जनतेला आवाहन केले की, 'मोहहाबादी येथे या आणि आपण सर्वजण त्याचे साक्षीदार होऊ या.'

शनिवारी सोरेन यांनी रांची येथे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. बॅनर्जी त्यांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहतील. या शपथविधी सोहळ्यास देशाचे अनेक नेते आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. नेत्यांव्यतिरिक्त बरेच मोठे उद्योगपतीही यात सहभागी होतील.

 

 

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, बसपा अध्यक्ष मायावती, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी, माजी अर्थमंत्री पी चिदंबरम आणि अहमद पटेल, बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम माझी, माजी केंद्रीय मंत्री तारिक अन्वर, माकपचे सरचिटणीस डी. राजा, माकप सरचिटणीस सीताराम येचुरी हे दिग्गज या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. 

23 डिसेंबरला  झारखंड निवडणुकीचा निकाल लागला. निकाल झामुमो-कॉंग्रेस आणि आरजेडी युतीच्या बाजूनं आले. झारखंडमध्ये 81 जागा असलेल्या आघाडीला 47 जागा मिळाल्या. सत्ताधारी भाजपला केवळ 25 जागा मिळाल्या. या निवडणुकीत जेएमएमने विक्रमी 30 जागा जिंकल्या आणि त्या विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष ठरला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी