Karauli violence : जिगरबाज पोलीस कॉन्स्टेबलनं आगीत अडकलेल्या तिघांना वाचवलं, देशभर होतेय धाडसाची चर्चा

राजस्थानच्या (Rajasthan) करौलीमध्ये (Karauli) नववर्ष स्वागताच्या मिरवणुकीत झालेल्या वादातून हिंसाचार झालेला होता. जाळपोळ देखील झाली होती. परिस्थिती पाहता प्रशासनाने परिसरातील कर्फ्यू (Curfew) 7 एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, जाळपोळ झाली त्यावेळचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे.

Jigarbaaz police constable rescues three trapped in fire
पोलीस कॉन्स्टेबलनं आगीत अडकलेल्या तिघांचा वाचवला जीव  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • एका पोलीस कॉन्स्टेबलने लहान मुलासह दोन महिलांना आगीतून वाचवलं.
  • मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पोलीस कॉन्स्टेबलचं कौतुक केलं आहे.

जयपूर : राजस्थानच्या (Rajasthan) करौलीमध्ये (Karauli) नववर्ष स्वागताच्या मिरवणुकीत झालेल्या वादातून हिंसाचार झालेला होता. जाळपोळ देखील झाली होती. परिस्थिती पाहता प्रशासनाने परिसरातील कर्फ्यू (Curfew) 7 एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, जाळपोळ झाली त्यावेळचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे. हा फोटो एका पोलीस कॉन्स्टेबलचा (Police Constable) आहे. पोलीस कॉन्स्टेबल आगीत अडकलेल्या एका लहान मुलाला कपड्यात गुंडाळून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या पोलीस कॉन्स्टेबलने लहान मुलासह दोन महिलांना आगीतून वाचवलं आहे. मुलाला वाचवत असताना या पोलीस कर्मचाऱ्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

दरम्यान, राजस्थानच्या करौलीमध्ये नववर्ष स्वागतासाठी रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत मारामारी आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. या आगीतून पोलीस कॉन्स्टेबल नेत्रेश शर्मा (Netresh Sharma) यांनी एका लहान मुलासह दोन महिलांचा जीव वाचवला. नैत्रेश यांच्या धाडसाचं मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी कौतुक केलं आहे. नेत्रेश यांना पदोन्नतीदेखील देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

हंसराज मीना यांचं ट्विट

राजस्थानात करौलीमध्ये हिंसाचाराची घटना घडली होती. काही समाजकंटकांनी दुकाने पेटवली होती. आग लागलेल्या दुकानात एका लहान बाळासह दोन महिला अडकल्या होत्या. सर्वत्र आगीचे लोळ उठले होते, दुकांना आगीने आपल्या विळख्यात घेतलं होतं. सर्वत्र धूर आणि आगी दिसत होत्या. अशा भयाण आगीत दोन्ही महिला आणि बाळ अडकले होते, त्यांना पाहून कॉन्स्टेबल नेत्रेश यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. आपल्या जीवाची पर्वा न करता नेत्रेश यांनी तिघांना वाचवण्याचा निर्णय घेतला. नेत्रेश यांनी महिलांच्या जवळील ओढणीने त्या बाळाला झाकलं आणि खांद्यावर घेत आगीतून धावत बाहेर पडले. यानंतर त्या महिलांचा देखील त्यांनी जीव वाचवला.

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

नेत्रेश यांनी दाखवलेल्या धाडसाचं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जात आहे. एखाद्या चित्रपटातील घटनेसारखी घटना प्रत्यक्षात घडल्याचं हा फोटो पाहून वाटतं. सोशल मीडियावर हा फोटो पाहून अनेक जण नेत्रेश यांचं कौतुक करत आहेत.

कॉन्स्टेबल नेत्रेशला मुख्यमंत्र्यांचा फोन आणि कौतुक

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी नेत्रेश यांना फोन करुन त्यांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल कौतुक केलं. नेत्रेश यांना पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा देखील अशोक गेहलोत यांनी दिल्या असून त्यांचे प्रमोशनदेखील  करण्याचा निर्णय घेण्यात आला. नैत्रेश 2013 मध्ये राजस्थान पोलिसांच्या सेवेत रुजू झाले होते. ते करौली शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी