Marriage by cheating: गुंगीचा लाडू देऊन अल्पवयीन मेहुणीचं अपहरण, जबरदस्तीनं केलं लग्न

आपल्या अल्पवयीन मेहुणीला त्याने गुंगीचं औषध दिलं. मग मंदिरात नेऊन तिला साडी नेसवली आणि लग्न केलं. त्यानंतर गुंगीच्या अंमलाखाली असताना तिच्यावर बलात्कार केला व तिला रस्त्यावर सोडून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Marriage by cheating
गुंगीचा लाडू देऊन अल्पवयीन मेहुणीचं अपहरण 
थोडं पण कामाचं
  • मेहुण्याने अल्पवयीन तरुणीचे अपहरण करून तिला दिला गुंगीचे औषध असणारा लाडू
  • गुंगीच्या अंमलाखाली असताना साडी नेसवून जबरदस्तीने लग्न केले व नंतर घरी नेऊन केला बलात्कार
  • पोलिसांकडून अगोदर टाळाटाळा, दबाव आल्यानंतर तपासाला सुरुवात

Marriage by cheating: आपल्या अल्पवयीन मेहुणीला (Sister in law) गुंगीचं औषध देऊन तिच्याशी लग्न करणाऱ्या आणि तिच्यावर बलात्कार करणाऱ्या मेहुण्याविरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. आपल्या पत्नीच्या बहिणीला कॉलेजच्या सोडण्याच्या बहाण्याने आपल्या गाडीत बसवून आरोपीने अल्पवयीन मुलीचे अपहरण केले आणि तिच्यावर अत्याचार केले. आपल्यावर झालेल्या अन्यायाला या तरुणीने वाचा फोडत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेशातील चित्रकुट परिसरात खळबळ उडाली आहे. 

अशी घडली घटना

चित्रकुट परिसरात राहणाऱ्या अवधेश केसरवानीचं आपल्या मेहुणीवर एकतर्फी प्रेम होतं. आपल्या पत्नीच्या बहिणीवर त्याचा अनेक दिवसांपासून डोळा होता. ही मुलगी कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. नेहमीप्रमाणे ती कॉलेजला जाण्यासाठी निघाली असता चारचाकी गाडीतून आलेल्या अवधेशनं तिला गाडीत बसण्याची विनंती केली. आपण तुला कॉलेजला सोडू, असं सांगत तिला गाडीत बसवलं. गाडीतून प्रवासादरम्यान तिला गुंगीचं औषध असणारा लाडू खायला दिला. त्यामुळे तरुणीला चक्कर आली. तिला कॉलेजवर न सोडता अवधेश तिला एका मंदिरात घेऊन गेला. 

अधिक वाचा - राम मंदिराचे काम कोणत्या दिवसापर्यंत पूर्ण होणार, तारीख ठरली; वेगाने काम सुरू

मंदिरात केले लग्न

अवधेशसोबत त्याचे काही मित्र आणि नातेवाईकदेखील होते. सर्वांनी त्याला या गुन्ह्यात साथ दिल्याची माहिती आहे. सर्वजण अल्पवयीन तरुणीला घेऊन मंदिरात गेले आणि तिथे नशेच्या अंमलाखाली असताना तिला साडी नेसवण्यात आली. त्यानंतर अवधेशनं तिच्याशी लग्न करून तिथे सात फेरेदेखील घेतले. त्यानंतर आपल्या घरी नेऊन तिच्यावर अमानूष बलात्कारही केला. त्यानंतर घराबाहेर रस्त्याच्या कडेला तिला सोडून अवधेश तिथून निघून गेला. 

तरुणीने केली तक्रार

गुंगीच्या अंमलातून बाहेर आलेल्या तरुणीनं आपल्या घरी धाव घेतली आणि आईला घडलेली सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून आईला जबर धक्का बसला. कामानिमित्त गुजरातच्या अहमदाबादमध्ये राहणाऱ्या आपल्या पतीला आणि मुलाला फोन करून तिने या घटनेची कल्पना दिली. दोघेही तातडीने चित्रकुटला आले आणि त्यांनी पोलिसांत तक्रार देण्याचा निर्णय घेतला. 

अधिक वाचा - Telangana : भाजप नेत्याकडून आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न; पोलिसांनी पकडले रंगेहाथ, 100 कोटीहून अधिक रुपये जप्त

पोलिसांचे असहकार्य

सुरुवातीला स्थानिक पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. त्यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी जिल्हा मुख्यालयात धाव घेत आपल्या अन्यायाला वाचा फोडली. मंदिरातील सीसीटीव्ही फूटेजवरून गुन्ह्याचा पुरावा पोलिसांना मिळाला असून लवकरच दोषींवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. 

पोलिसांवर दबाव

अगोदर तक्रारही नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांवरील दबाव आता वाढू लागल्याचं चित्र आहे. मंदिरात जबरदस्तीनं लग्न लावल्याच्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. या प्रकरणी तरुणीला न्याय मिळावा, अशी मागणी तिच्या कुटुंबीयांनी केली आहे. पोलीस सध्या अवधेश आणि त्याच्यासोबत या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या इतरांचा शोध घेत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी