Jnanpith Award : कोंकणी भाषेतील साहित्यकार दामोदर मावझो आणि आसामी कवी नीलमणी फूकन यांना 57 वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

57th Jnanpith Award Two writers:देशाचा सर्वोच्च साहित्य पुरस्कार ज्ञानपीठ (jnanpith Award) यावर्षी दोन साहित्यिकांना जाहीर झाला. कोंकणी भाषेतील प्रसिद्ध कादंबरीकार, साहित्यकार दामोदर मावझो (Damodar Mauzo) यांना 2021 या वर्षीचा साहित्य (literature) क्षेत्रातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे.

Jnanpith Award
यंदा दोन साहित्यांकांना मिळाला 57 वा ज्ञानपीठ पुरस्कार   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ज्ञानपीठ पुरस्काराचे स्वरुप रोख 11 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असते.
  • ज्ञानपीठ हा देशातला सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार मानला जातो.
  • दामोदर मावझो हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे कोकणातील दुसरे साहित्यिक आहेत.

57th Jnanpith Award Two writers: पणजी :  देशाचा सर्वोच्च साहित्य पुरस्कार ज्ञानपीठ (jnanpith Award) यावर्षी दोन साहित्यिकांना जाहीर झाला. कोंकणी भाषेतील प्रसिद्ध कादंबरीकार, साहित्यकार दामोदर मावझो (Damodar Mauzo) यांना 2021 या वर्षीचा साहित्य (literature) क्षेत्रातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्याबरोबर आसामी कवी (Assamese poet) नीलमणी फूकन (Neelmani Phookan) यांनाही हा पुरस्कार मिळाला आहे. संस्थेनं काल 57 व्या ज्ञानपीठ पुरस्कारांची  (57th Jnanpith Award ) घोषणा केली. दरवर्षी जगभर ज्याप्रमाणे साहित्याच्या नोबेल पुरस्कारा (Nobel Prize) ची प्रतिक्षा असते तेवढीच प्रतिक्षा ज्ञानपीठ पुरस्काराचीही असते. ज्ञानपीठ हा देशातला सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार मानला जातो.  

कोण आहेत दामोदर मावझो

दामोदर मावझो हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे कोकणातील दुसरे साहित्यिक आहेत. त्याआधी रविंद्र केळकर यांना हा पुरस्कार मिळाला आहे. तर आसामी भाषेतल्या साहित्यिकाला ज्ञानपीठ मिळण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी आसामी भाषेत 1979 साली बी.के.भट्टाचार्य आणि 2000 साली इंदिरा गोस्वामी यांना ह्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर आता नीलमनी फूकन यांना पुरस्कार जाहीर झाला. या ज्ञानपीठ पुरस्कारचे स्वरुप 11 लाख रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असं आहे.

कोण आहेत दामोदर मावजो?

दामोदर मावझो 77 वर्षांचे यांचा जन्म 1944 साली दक्षिण गोव्यातील माजोर्डा येथे झाला. शाळेत ते गोव्यातच गेले तर पदवी शिक्षण मात्र त्यांनी मुंबईत पूर्ण केलं. गांथन हा मावझोचा पहिला कथासंग्रह तो 1971 साली प्रकाशित झाला. त्यानंतर 1983 मध्ये त्यांच्या ‘कार्मोलिन’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. ह्या कादंबरीचे 12 देशी परदेशी भाषांमध्ये भाषांतर केले गेले आहे. गोवा कला अकादमी आणि गोवा साहित्य मंडळाच्या पुरस्कारांनीही मावझो सन्मानित आहेत.दामोदर मावझो यांनी गेल्या चार दशकांमध्ये विपुल लेखन केले आहे. त्यामध्ये त्यांनी कादंबरी, कथा, नाट्य लेखन, स्तंभ लेखन केले आहे. ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर दामोदर मावझो यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. 

दामोदर मावझो यांची ग्रंथसंपदा

कादंबरी
1975 –सूड
1981 – कार्मेलीन
2009- सुनामी सायमन
2020-जीव दिवं काय च्या मारूं
कार्मेलीन ही कादंबरी हिंदी, मराठी, इंग्लिश,पंजाबी, सिंधी, तामिळ, उडिया, मैथिली या भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आली आहे.

कथा 

1971– गांथन
1975 – जागरणां
1981 – रुमडफूल
2001 – भुरगीं म्हगेली तीं
2014- सपनमोगी
2020-तिश्टावणी

कोण आहेत नीलमणी फूकन?

नीलमणी फूकन (Neelmani Phukan) हे आसामी भाषेतील परिचित नाव आहे. आधुनिक आसामी कवितेचा चेहरा म्हणून नीलमनी फूकन यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचा जन्म 1933 साली गोलाघाट जिल्ह्यातल्या डेरगावात झाला. 1981 साली कोबिता ह्या काव्यसंग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला तर 2002 साली साहित्य अकादमीची फेलोशिप मिळाली. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दोन्ही साहित्यिक हे सत्तरीच्या पुढचे आहेत. ह्या पुरस्कारामुळे कथा, कविता आणि कादंबरी अशा साहित्याच्या तिनही शाखांचा गौरव झाल्याची भावना व्यक्त केली जाते.ज्ञानपीठ हा भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार असून तो भारतातील अनुसूची यादीत असलेल्या सर्व भाषांमधील लेखनासाठी दिला जातो. पुरस्कार विजेत्याला 11 लाख रुपये दिले जातात. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी