Biden on Elon Musk : इलॉन मस्कवर संतापले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन...ट्विटरच्या खोटारडेपणावर ठेवले बोट

Twitter takeover : ट्विटरमध्ये (Twitter)सध्या रोजच नवनवीन घडामोडी घडत आहेत. आता त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांची भर पडली आहे. जो बायडेन ट्विटरवर संतापले आहेत. त्यांनी ट्विटरवर बोलताना इलॉन मस्क यांच्यावरदेखील टीका केली आहे. इलॉन मस्कने ट्विटर विकत घेण्यासंदर्भात त्यांनी खडे बोल सुनावले आहेत.

Joe Biden on twitter
जो बायडेन ट्विटरवर संतापले 
थोडं पण कामाचं
  • ट्विटर सध्या वादाच्या भोवऱ्यात
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बोयडेनचा मस्क आणि ट्विटरवर संताप
  • ट्विटरच्या खरेपणाबद्दल शंका

Joe Biden on Twitter : नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क (Elon Musk)यांनी ट्विटरबरोबरचा सौदा पूर्ण करत ट्विटरवर ताबा मिळवला आणि ट्विटर वादाचा आणि चर्चेचा विषय झाले आहे. ट्विटरमध्ये (Twitter)सध्या रोजच नवनवीन घडामोडी घडत आहेत. आता त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांची भर पडली आहे. जो बायडेन ट्विटरवर संतापले आहेत. त्यांनी ट्विटरवर बोलताना इलॉन मस्क यांच्यावरदेखील टीका केली आहे. इलॉन मस्कने ट्विटर विकत घेण्यासंदर्भात त्यांनी खडे बोल सुनावले आहेत. ट्विटर ही एक खोटी माहिती पसरवणारी कंपनी असल्याचे बायडेन यांनी म्हटले आहे. मस्क यांनी खोटे प्रसारित करणारी कंपनी विकत घेतली आहे. भविष्यात नेमके काय धोक्यात असणार आहे हे मुलांना कळेल की नाही याची आम्हाला काळजी वाटते आहे. एरवी इलॉन मस्कवर जगभरातील विविध कॉमेंट्स आणि टीकादेखील होत होती. मात्र आता खुद्द अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीच ट्विटर आणि मस्कला निशाण्यावर घेतल्याने याचे गांभीर्य वाढले आहे. इलॉन मस्कने या महिन्याच्या सुरुवातीला 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर विकत घेतले होते. (Joe Biden criticises Elon Msuk and Twitter)

अधिक वाचा  :मुंबईत पुन्हा सीएनजी-पीएनजीच्या दरात वाढ

ट्विटरच्या सौद्याबाबत बोलताना टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या बलाढ्य कंपन्यांचे मालक मस्क म्हणाले की त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतला कारण संस्कृतीच्या भविष्यासाठी सामान्य डिजिटल टाउन स्क्वेअर असणे महत्त्वाचे आहे. जिथे ट्विटरव हिंसेचा आधार न घेता चर्चा, वादविवाह करता यावेत. ट्विटर विकत घेण्याआधी मस्क म्हणाले होते की, "ट्विटर स्पष्टपणे सर्वांसाठी मुक्त व्यासपीठ बनू शकत नाही जिथे परिणामाशिवाय काहीही सांगितले जात नाही! आमचे व्यासपीठ देशाच्या कायद्यांचे पालन करून सर्वांचे स्वागत करते. तुमच्या आवडीनुसार तुमचा इच्छित अनुभव निवडू शकता."

अधिक वाचा  : 'द केरला स्टोरी'चा टीझर आऊट

बायडेन का चिडले?

जो बिडेन यांनी इलॉन मस्क यांच्या निर्णयावर टीका केली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने जगभरात खोटे पसरवणारी कंपनी विकत घेतली आहे. बायडेन पुढे म्हणाले की, आता आपण कशाची काळजी करावी? काय धोक्यात आहे हे मुलांनी समजून घ्यावे अशी आपण अपेक्षा कशी करू शकतो? ट्विटर मस्कच्या हातात गेल्याने बायडेन पुढील पिढ्यांविषयी चिंता व्यक्त करत आहेत. येथे हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे की 2020 मध्ये झालेल्या अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान, फेक न्यूजच्या आरोपाखाली ट्विटरने तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बंदी घातली होती. ट्विटरच्या धोरणाबाबत अजूनही परिक्षण सुरूच आहे.

अधिक वाचा  : पुरुषांच्या या तीन सवय पाहून महिला होत असतात घायाळ

इतकेच नाही तर,अमेरिकेच्या संसदेच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी यांचे पती पॉल पेलोसी यांच्यावरील हल्ल्याबाबत कटाचा सिद्धांत ट्विट केल्यानंतर मस्क स्वत: फेक न्यूजचा बळी ठरले होते. यामुळे सध्या अमेरिकेत ट्विटर आणि त्याचा प्रभाव यावर जोरदार चर्चा सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी