Joe Biden: जो बायडेन यांनी घेतली राष्ट्राध्यक्षपदाची शपथ, बायडेन अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष

Joe Biden: जो बायडेन यांनी अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. तर कमला हॅरिस या उपराष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली आहे.

Joe Biden inauguration day updates Kamala harries swearing-in ceremony
Joe Biden Inauguration Live: जो बायडेन यांचा शपथविधी सोहळा  |  फोटो सौजन्य: AP

अमेरिकेत (America) आजपासून नव्या युगाची सुरुवात झाली आहे. जो बायडेन (Joe Biden) यांनी अमेरिकेच्या ४६व्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आहे तर कमला हॅरिस या उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. अमेरिकेचे मुख्य न्यायाधीश हे जो बायडेन यांनी त्यांना शपथ दिली. ७८ वर्षीय जो बायडेन हे शपथविधीनंतर अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून भाषण केलं.

जो बायडेन हे १९७३ मध्ये डेलावेयर येथून सर्वात तरुण सिनेटचा सदस्य म्हणून निवडून गेले होते. तर उपराष्ट्रपती पदाची शपथ घेणाऱ्या कमला हॅरिस (Kamala harries) या भारतीय वंशाच्या पहिल्या आफ्रिकन-अमेरिकन नागरिक आहेत. ज्यावेळी बराक ओबामा हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा जो बायडेन हे उपराष्ट्रपती होते.

Updates

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडेन यांनी शपथ घेतल्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन शुभेच्छा दिल्या आहेत. 

आपल्या समोर खूप आव्हाने आहेत, कोरोनाचा मोठा फटका अमेरिकेला बसला आहे - जो बायडेन

आपल्याला शांतताप्रिय अमेरिका हवी आहे - जो बायडेन

अमेरिकेत वर्णभेद संपवण्यासाठी लढाई लढायची आहे - जो बायडेन

एकत्र येऊन अमेरिकेच्या विकासासाठी काम करू - जो बायडेन

विकासासाठी मेहनतीने काम करू - जो बायडेन

देशांतर्गत दहशतवादाला हरवण्याचं आव्हान आहे - जो बायडेन

अमेरिकेला एकत्र आणणे हे माझे पहिलं लक्ष्य आहे - जो बायडेन

देशासाठी खूप काही करण्याची गरज आहे - जो बायडेन

आजचा दिवस इतिहास आणि आशेचा दिवस आहे - जो बायडेन

लोकशाहीसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे - जो बायडेन

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यावर जो बायडेन यांचे भाषण

जो बायडेन यांनी घेतली राष्ट्राध्यक्षपदाची शपथ, बायडेन अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष

कमला हॅरिस यांनी घेतली उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ

नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आपली पत्नी जिल बायडेन यांच्यासोबत. तर उपाध्यक्षपदावर निवड झालेल्या कमला हॅरिस आपल्या पतीसोबत शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचले.

माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि २०१६मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचे शपथविधी सोहळ्यासाठी आगमन 

शपथविधी सोहळ्यामुळे अमेरिकेत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. विशेषत: वॉशिंग्टनमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था कऱण्यात आल्याचं पहायला मिळलं. काही दिवसांपूर्वी अमेरिकन कॅपिटलमध्ये ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हिंसक निषेधाच्या पार्श्वभूमीवर पोलीस विशेष दक्षता घेत आहेत. कॅपिटलकडे जाणाऱ्या रस्त्यांवर हजारो सुरक्षा कर्मचारी, पोलीस तैनात करण्यात आले होते.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीसाठी झालेले मतदान ३ नोव्हेंबर रोजी पूर्ण झाले. त्यानंतर जवळपास तीन दिवस मतमोजणी सुरू होती. मतमोजणीवरुन वेगवेगळे वाद निर्माण होत होते आणि त्यामुळे जो बायडेन हे मतमोजणीत आघाडीवर असतानाही राष्ट्राध्यक्ष होणार की नाही यावरुन संभ्रम निर्माण झाला होता. पण अखेर सात नोव्हेंबर रोजी जो बायडेन हे राष्ट्राध्यक्ष होणार असल्याचं स्पष्ट झालं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी