पत्रकार सुधीर चौधरी ‘दहशतवादी’ आहेत; UAE च्या राजकन्येनं वक्त्यांच्या यादीतून वगळलं

संयुक्त अरब अमिरातीमधील एका कार्यक्रमामधून भारतीय पत्रकार सुधीर चौधीर यांना वगळण्यात आले आहे. देशाच्या राजकुमारी असणाऱ्या हेंड बिंत फैसल अल कासिम यांनी रविवारी सोशल नेटवर्किंगवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.

Journalist Sudhir Chaudhary terroris
पत्रकार सुधीर चौधरी यांना UAE च्या राजकन्येनं म्हटलं दहशतवादी  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • सुधीर चौधरी विरोधात खंडणी वसूली करण्याचे आरोप
  • राजकुमारी असणाऱ्या हेंड बिंत फैसल अल कासिम यांनी सुधीर चौधीर कार्यक्रमात वक्ता असण्यावरुन आक्षेप घेतला.
  • कोणत्याही धर्म किंवा वंशाला द्वेषपूर्ण भाषणाच्या माध्यमातून लक्ष्य करणे युएईच्या कायद्याने गुन्हा - राजकुमारी

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरातीमधील एका कार्यक्रमामधून भारतीय पत्रकार सुधीर चौधीर यांना वगळण्यात आले आहे. देशाच्या राजकुमारी असणाऱ्या हेंड बिंत फैसल अल कासिम यांनी रविवारी सोशल नेटवर्किंगवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. राजकुमारी यांनी स्वत: शनिवारी सुधीर चौधरी यांना संयुक्त अरब अमिरातीमधील कार्यक्रमासाठी वक्ता म्हणून बोलवण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला होता. सुधीर चौधरी हे वादग्रस्त व्यक्तीमत्व असून ते असहिष्णु दहशतवादी आहेत, अशा शब्दांमध्ये राजकुमारीने टीका केली आहे.

राजकुमारी यांनी ट्विटरवरुन सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, “सुधीर चौधरी यांना आबू-धाबी चार्टर्ड अकाऊंट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातील वक्ता म्हणून वगळण्यात आले आहे.” राजकुमारींनी आपल्या ट्विटमध्ये एक पत्रही लिहिले असून ते आयसीएआयच्या आबू-धाबीमधील शाखेच्या सदस्यांनी लिहिले आहे. या पत्रामध्ये चौधरी यांना वक्ता म्हणून बोलवण्यावर आक्षेप घेण्यात आला. चौधरी हे प्रसिद्धी टीव्ही अँकर असले तरी त्यांच्याविरोधात खंडणी मागण्यापासून ते अनेक प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचा उल्लेख पत्रात आहे.

दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी युएईमध्ये कोणत्याही धर्म किंवा वंशाला द्वेषपूर्ण भाषणाच्या माध्यमातून लक्ष्य करणे कायद्याने गुन्हा असल्याची माहिती दिली. राजकुमारी हेंड बिंत फैसल अल कासिम यांनी एका टीव्ही कार्यक्रमामधील चर्चेदरम्यान ‘इस्लामबद्दल भिती निर्माण करण्याच्या मानसिकतेला पाठिंबा देणाऱ्या वृत्तवाहिनीचे न्यूज अँकर सुधीर चौधरी’ यांना दुबईमधील कार्यक्रमात आमंत्रित करण्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. यासारख्या लोकांमुळे भारतामध्ये मुस्लीमांवर अन्याय होत आहेत. असं असताना आपण आपल्या देशामध्ये यांना आमंत्रित करावं का? असा प्रश्नही राजकुमारींनी यापूर्वी ट्विटरवरुन या कार्यक्रमाच्या जाहिरातीचे कात्रण शेअर करत विचारला होता..

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी