59 वर्षांत पहिल्यांदाच पृथ्वीच्या इतक्या जवळ येणार गुरू ग्रह, सोमवारी पहायला मिळणार अद्भूत नजारा

Jupiter will come close earth: 26 सप्टेंबर रोजी एक अद्भूत नजारा पहायला मिळणार आहे. 

jupiter will come close to earth for first time in 59 years you will see wonderful view read in marathi
59 वर्षांत पहिल्यांदाच पृथ्वीच्या इतक्या जवळ येणार गुरू ग्रह, सोमवारी पहायला मिळणार अद्भूत नजारा (प्रातिनिधिक फोटो) 
थोडं पण कामाचं
  • 59 वर्षांनी इतक्या जवळ येणार गुरू
  • सोमवारी अवकाशात पहायला मिळणार अद्भूत नजारा
  • 1963 मध्ये इतक्या जवळ आले होते दोन्ही ग्रह, खूपच चमकणार गुरू 

Jupiter will be closest to the earth: आपल्या सौरमालेतील सर्वात मोठा आणि विशाल असा ग्रह असलेला गुरू येत्या 26 सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या खूपच जवळ येणार आहे. 59 वर्षांत पहिल्यांदाच हा योग येत आहे. अमेरिकेतील अंतराळ संस्था नासाने सांगितले की, हा सर्वात मोठा ग्रह सूर्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला असणार आहे. गुरू ग्रहाच्या या दिशा बदलाच्या घटनेला वैज्ञानिक भाषेत अपोझिशन असंही म्हटलं जातं. (jupiter will come close to earth for first time in 59 years you will see wonderful view read in marathi)

ही एक सामान्य गोष्ट आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक वर्षी पृथ्वी आणि गुरू खूपच जवळ येतात. मात्र, यावेळी दोन्ही ग्रहांमधील अंतर हे खूपच कमी होणार आहे. त्यामुळे पृथ्वीवरुन गुरू ग्रह हा सामान्याच्या तुलनेत आकाराने खूपच मोठा दिसणार आहे.

हे पण वाचा : सोनाली पाटीलचा अमेझिंग लूक

कधी दिसणार हा नजारा? 

25 आणि 26 सप्टेंबर रोजी सूर्य आणि गुरू यांच्यातून पृथ्वी पाहण्याच ही घटना खूपच दुर्मिळ असणार आहे. 25 सप्टेंबर रोजी पृथ्वी आणि गुरू ग्रह यांच्यातील अंतर कमी होणार आहे तर 26 सप्टेंबर रोजी सूर्य विरुद्ध दिशेला दिसून येईल. पृथ्वीच्या खूपच जवळ येत असल्याने हा विशाल असा ग्रह असामान्य रूपात खूपच चमकदार आणि तेजस्वी असा दिसून येईल. स्कायवॉचर्स किंवा खगोलप्रेमींसाठी खूपच मोठी घटना आहे.

हे पण वाचा : गरोदरपणात लसूण खाण्याचे असंख्य फायदे, तुम्हाला माहितीयेत का?

नासाने काय म्हटलं? 

नासाच्या मार्शल स्पेस फ्लाइट सेंटरमधील एका खगोल वैज्ञानिक अ‍ॅडम कोबेल्स्की यांनी म्हटलं, 26 सप्टेंबरपूर्वी आणि नंतर काही दिवस सुद्धा गुरू ग्रह खूपच तेजस्वी तसेच मोठा दिसून येईल. 25 आणि 26 सप्टेंबर रोजी चांगले वातावरण असल्यास हा ग्रह खूपच जवळून पाहता येऊ शकतो. खगोलप्रेमींनी आणि नागरिकांनी या अद्भूत नजाऱ्याचा आनंद घ्यायला हवा.

सूर्यमालेतील ग्रह हे सूर्याभोवती वर्तुळाकार ऐवजी अंडाकार मार्गाने भ्रमण करतात. त्यामुळे पृथ्वी आणि गुरू हे वेगवेगळ्या अंतरावर मार्ग ओलांडत असतात. पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी जवळपास 365 दिवस लागतात. तर गुरू ग्रहाला सूर्याची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासााठी 4333 दिवस लागतात. गुरू 12 वर्षंत एकदा सूर्याला प्रदक्षिणा पूर्ण करतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी