'काली' डॉक्युमेंट्री पोस्टर वाद, कॅनडाच्या संग्रहालयाने मागितली माफी, नाही दाखवणार डॉक्युमेंट्री

kali documentary poster controversy canada museum says it deeply regrets and presentation is no longer being shown : 'काली' डॉक्युमेंट्री पोस्टर वाद प्रकरणात कॅनडाच्या संग्रहालयाने माफी मागितली. डॉक्युमेंट्रीची निर्मिती करणाऱ्या लीना मणिमेकलाई यांनी अद्याप माफी मागितलेली नाही.

kali documentary poster controversy
'काली' डॉक्युमेंट्री पोस्टर वाद, कॅनडाच्या संग्रहालयाने मागितली माफी, नाही दाखवणार डॉक्युमेंट्री  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • 'काली' डॉक्युमेंट्री पोस्टर वाद, कॅनडाच्या संग्रहालयाने मागितली माफी, नाही दाखवणार डॉक्युमेंट्री
  • डॉक्युमेंट्रीची निर्मिती करणाऱ्या लीना मणिमेकलाई यांनी अद्याप माफी मागितलेली नाही
  • डॉक्युमेंट्रीही मागे घेतलेली नाही

kali documentary poster controversy canada museum says it deeply regrets and presentation is no longer being shown : 'काली' डॉक्युमेंट्री पोस्टर वाद प्रकरणात कॅनडाच्या संग्रहालयाने माफी मागितली. डॉक्युमेंट्रीची निर्मिती करणाऱ्या लीना मणिमेकलाई यांनी अद्याप माफी मागितलेली नाही. भारतीय दूतावासाने तक्रार केल्यानंतर कॅनडाच्या संग्रहालयाने माफी मागितली. डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. याची जाणीव ठेवून संग्रहालयात किंवा संग्रहालयाच्या माध्यमातून इथून पुढे संबंधित डॉक्युमेंट्रीचा प्रचार केला जाणार नाही. तसेच ही डॉक्युमेंट्री संग्रहालयात प्रदर्शित करणार नाही, असे टोरंटोतील आगा खान संग्रहालयाच्या व्यवस्थापनाने जाहीर केले.

Ajmer : नुपुर शर्मा विषयी चिथावणी देणारे वक्तव्य केले, अजमेर दर्ग्याच्या खादिम सलमान चिश्तीला अटक

डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरवर हिंदू देवीला धूम्रपान करताना तसेच एलजीबीटीक्यूच्या झेंड्यासोबत दाखवले आहे. यावरूनच वाद सुरू झाला. हे पोस्टर सोशल मीडियावर टाकण्यात आले आहे. पोस्टर सोशल मीडियावर येण्याआधी त्याचे औपचारिक उद्घाटन कॅनडातील टोरंटोतल्या संग्रहालयात झाले होते. या प्रकरणात भारताच्या दूतावासाने तसेच अनेक नागरिकांनी हिंदूंच्या भावना दुखावल्याची तक्रार दिली आहे. 

संग्रहालयाने अंडर द टेंट या प्रोजेक्ट अंतर्गत १८ लघुपट तयार केले. यापैकी 'काली' डॉक्युमेंट्रीचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि वादाला तोंड फुटले. 

कॅनडातील आगा खान संग्रहालयाने अंडर द टेंट या प्रोजेक्ट अंतर्गत १८ लघुपट तयार केले. या लघुपटांना पहिल्यांदा संग्रहालयात दाखविण्यात आले. नंतर लघुपटांची पोस्टर तयार करण्यात आली. यापैकी 'काली' डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरवरून वाद झाला आहे. भारताच्या दूतावासाने या प्रकरणात तक्रार करताच कॅनडाच्या संग्रहालयाने माफी मागितली आणि संग्रहालय ही डॉक्युमेंट्री दाखवणार नाही असे जाहीर करण्यात आले. पण अद्याप डॉक्युमेंट्रीची निर्मिती करणाऱ्या लीना मणिमेकलाई यांनी माफी मागितलेली नाही तसेच डॉक्युमेंट्रीही मागे घेतलेली नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी