कोण आहेत भारतीय वंशाच्या कमला हॅरिस?  अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीमुळे आल्या चर्चेत 

kamala harris : अमेरिकच्या उपराष्ट्राध्यक्षपदासाठी आपली उमेदवारीमुळे इतिहास रचणाऱ्या भारतीय वंशाच्या कमला हॅरिस सध्या चर्चेत आहेत. जाणून घेऊ या त्याचे कौटुंबिक बॅकग्राउंड 

kamala harris is the joe bidens vice president choice get detail information
कोण आहेत भारतीय वंशाच्या कमला हॅरिस?  

नवी दिल्ली :  अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून तिकीट मिळविणाऱ्या कमला हॅरिस (kamala harris)या पहिल्या आशियाई उमेदवार बनल्या आहेत. आपल्या उमेदवारीनेच त्यांनी अमेरिकेपासून (America) भारतापर्यंत (India) एक नवा इतिहास रचला आहे. त्यांना डेमोक्रेटिक राष्ट्रपती पदाचे उमेदवार जो बिडेन (Joe Biden) यांनी मंगलवारी या पदाचे उमेदवार म्हणून निवडले. अमेरिकेचे प्रेसिडेंशियल तिकीट मिळविणाऱ्या त्या पहिल्या एशियन-अमेरिकन (Asian-American) महिला आहेत. 

आई आहे भारतीय 

कमला हॅरिस यांची आई ही भारतीय आहे. त्या चेन्नई येथे राहतात. त्यांच्या आईचे नाव श्यामला गोपालन हॅरिस आहे. त्या एक कॅन्सर रिसर्चर होत्या. त्याचे २००९ मध्ये निधन झाले. तर त्यांचे वडील हे जमेकन आहेत त्यांचे नाव डोनाल्ड हॅरिस आहे. ते स्टॅनफोर्ड युनिवर्सिटीमध्ये शिकवतात. 

कमला हॅरीस आणि त्यांचे दोन लहान भाऊ छोटे होते तेव्हाच त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. कमला या आपल्या आईसोबत लहानपणापासून राहत होत्या. त्यामुळे त्यांच्यावर आपल्या आईचा अधिक प्रभाव आहे. 

अमेरिकत आश्चर्य आणि कौतुक

अमेरिकत अशा वेळी त्यांचे उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून त्यांची निवड ही आश्चर्यजनक आहे. नुकतीच अमेरिकेत वंशभेदी घटना घडली आहे. राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार बिडेन यांनी रंग आणि लिंग यांचा विचार न करता या पदासाठी एका महिलेचे नाव निवडले आहे. त्यामुळे त्यांची खूप प्रशंसा होत आहे. 

कायम टॉपवर

हॅरिस अमेरिकन सिनेटच्या इतिहासात दुसरी ब्लॅक वुमन बनल्या आहेत. ज्या कायम टॉपवर होत्या. सुरूवातीपासून टॉपवर असलेल्या कमला हॅरीस कायम अमेरिकेत लो प्रोफाइल राहिल्या. त्यांचे पोलिस सुधारणा आणि सामाजिक न्याय याबाबत चांगले काम आहे. 

सिनेटमध्ये त्या कायम रिपब्लिकन प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात कायम अग्रस्थानी राहिल्या. तसेच पक्षांतर्गत टीका करण्यासाठी ओळखल्या जातात. हॅरीस यांना ही उमेदवारी मिळल्यानंतर अशी उमेदवारी मिळणाऱ्या त्या पहिल्या इंडियन-अमेरिकन डेमोक्रॅट बनल्या आहेत. 

कमला हॅरिस यांच्या कारकिर्द

कमला हॅरिस यांनी सॅन फ्रान्सिस्को येथे डिस्ट्रिक्ट अटर्नी म्हणून काम केले आहे. हॅरीस २०१७ मध्ये कॅलिफोर्नियामध्ये अमेरिकन सीनेटर म्हणून शपथ घेतली होती. त्या होमलँड सिक्युरिटी अँड गव्हर्मेंट अफेअर कमिटी, सिलेक्ट कमिटी इंटेलिजेंस, कमिटी ऑफ ज्युडीशरी, कमिटी ऑफ बजेटमध्येही होत्या.  ऑकलंडमध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या आहेत. त्यांनी ग्रॅज्युएशनचे शिक्षण हॉवर्ड विद्यापीठातून घेतले आहे. तर वकिलीचे शिक्षण युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातून घेतले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी