Kanpur Triple Murder : ओमिक्रॉनची दहशत; ओमिक्रॉन सर्वांचा जीव घेईल म्हणत डॉक्टराने घेतला पत्नी अन् दोन मुलांचा जीव

Omicron Terror, Kanpur Triple Murder : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूरमध्ये (Kanpur) एकाच घरातील तीन जणांची हत्या झाल्याची उघडकीस आली आहे. ही हत्या बाहेरील कोणी व्यक्तीने नाही तर घरातील प्रमुख व्यक्ती असलेल्या डॉक्टरने पत्नी आणि दोन मुलांची निर्घृण हत्या (Kanpur Triple Murder) केल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला.

The doctor took the life of his wife and two children
ओमिक्रॉनच्या भीतीने डॉक्टरने संपवलं अख्य कुटुंब  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ओमिक्रॉन सर्वांचा जीव घेईल” अशी भीती सुसाईड नोटमध्ये व्यक्त करण्यात आली आहे.
  • आरोपी डॉ. सुशील कुमार हा कानपूरमधील एका हॉस्पिटलमध्ये फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख म्हणून कार्यरत आहे.
  • पोलिसांना घटनास्थळी रक्ताने माखलेला हातोडा सापडला आहे.

Omicron Terror, Kanpur Triple Murder : लखनौ : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूरमध्ये (Kanpur) एकाच घरातील तीन जणांची हत्या झाल्याची उघडकीस आली आहे. ही हत्या बाहेरील कोणी व्यक्तीने नाही तर घरातील प्रमुख व्यक्ती असलेल्या डॉक्टरने पत्नी आणि दोन मुलांची निर्घृण हत्या (Kanpur Triple Murder) केल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला. दरम्यान हत्येनंतर आरोपी डॉक्टर सुशील कुमार (Dr Sushil Kumar) पसार झाला असून पोलीस (Police) त्याचा शोध घेत आहेत. 

प्राथमिक तपासात हत्येचे कारण समोर आले आहे. हत्येचं कारण ऐकून सर्वजण अवाक झाली आहेत, “ओमिक्रॉन (Omicron) सर्वांचा जीव घेईल” अशी भीती व्यक्त करत डॉक्टरने हातोड्याने वार करत आपलं कुटुंब संपवलं. आरोपी डॉक्टर गेल्या काही काळापासून नैराश्याच्या गर्तेत असल्याचे समोर आले असून डॉक्टर सध्या फरार आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. सुशील कुमार हा कानपूरमधील एका हॉस्पिटलमध्ये फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख म्हणून कार्यरत आहे. त्याने 48 वर्षीय पत्नी, 18 वर्षीय मुलगा आणि 15 वर्षीय मुलीची हत्या केली. त्यानंतर भावाला फोन करुन त्याने या तिहेरी हत्याकांडाची माहिती दिली आणि पोलिसांना बोलवायला सांगितलं. मात्र भाऊ किंवा पोलीस येण्याच्या आतच तो घटनास्थळावरुन पसार झाला.

सुसाईड नोटमध्ये व्यक्त केली ओमिक्रॉनची भीती?

हत्येच्या ठिकाणी सापडलेल्या डायरीवरुन डॉक्टरला ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटविषयी चिंता सतावत असल्याचे दिसते. “ओमिक्रॉन सर्वांचा जीव घेईल, माझ्या निष्काळजीपणामुळे, मी अशा ठिकाणी अडकलो आहे, जिथून बाहेर पडणे कठीण आहे.” असे डॉक्टरने डायरीत लिहिले आहे.

हत्या करून कुटुंबाला मोक्ष मिळवून दिला 

पोलिसांनी तिन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. रक्ताने माखलेला हातोडा पोलिसांना घटनास्थळी सापडला आहे. डायरीमध्ये त्याने ‘असाध्य आजाराने’ ग्रासल्याचा उल्लेख केला आहे. आपण आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडू शकत नाही. त्यामुळे सर्वांना मोक्ष मिळवून दिला आहे, असंही त्याने म्हटलं आहे.

डॉक्टरने आत्महत्या केल्याची शंका

डॉक्टरची डायरी हीच सुसाईड नोट मानून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हत्याकांडानंतर डॉक्टरनेही स्वतःच्या आयुष्याची अखेर केल्याची शंका पोलिसांना आहे. त्याने पाण्यात उडी मारुन जीव दिल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी