Karnataka Bypoll Results 2019: कर्नाटक पोटनिवडणुकीचे कल समोर, भाजपने केला सुडपा साफ, काँग्रेसला पराभव मान्य

लोकल ते ग्लोबल
Updated Dec 09, 2019 | 15:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

 Karnataka Election Results Today:  कर्नाटकच्या १५ विधानसभा जागांसाठी झालेल्या पोट निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. 

 karnataka assembly bypoll results 2019 bs yediyurappa govts future hinges on bypoll results political news in marathi google newsstand
Karnataka Bypoll Results : कर्नाटक पोटनिवडणुकीचे कल भाजपकडे 

 नवी दिल्ली :  Karnataka Bypoll Results: कर्नाटकच्या १५ विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत (Karnataka Bypolls) आतापर्यंत आलेल्या प्राथमिक कलानंतर काँग्रेसने आपला पराभव मान्य केला आहे. काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार यांनी सांगितले की, जनतेने दल बदलणाऱ्यांना स्वीकारले आहे. काँग्रेसला या पोटनिवडणुकीत मोठा झटका बसला आहे. आतापर्यंत आलेल्या कलांनुसार १२ पैकी ९ जागांवर काँग्रेस मागे पडलेली दिसत आहे. बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa)यांच्या भाजप (BPJ) सरकारसाठी ही पोटनिवडणूक खूप महत्त्वाची होती. सत्ताधारी भाजपला २२३ सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी ७ जागा कमी पडत होत्या. जुलैमध्ये काँग्रेस आणि जेडीएस (Congress-JDS)च्या एकूण १७ आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे एचडी कुमार स्वामी (HD Kumaraswamy) याच्या आघाडीचे सरकार कोसळले होते. त्यानंतर बीएस येडियुरप्पा यांच्या नेतृत्त्वाखाली पुन्हा सरकार स्थापन झाली होती. १७ आमदारांना तत्कालिन विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवले होते. तसेच निवडणूक लढविण्यास बंदी घातली होती. पण सुप्रीम कोर्टाने नोव्हेंबरमध्ये या निर्णयाला अयोग्य ठरवत आमदारांना निवडणूक लढविण्यास मुभा दिली होती. यातील ज्या १७ आमदारांनी राजीनामा दिला होता. त्याच्या जागांवर पोटनिवडणूक होणे आवश्यक होते. पण  हे प्रकरण कोर्टात असल्याने १५ जागांवर निवडणुका झाल्या.

येडियुरप्पा यांचा १३ जागा जिंकण्याचा दावा 

मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी दावा केला की, त्यांचा पक्ष १५ पैकी १२ जागा जिंकणार आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, भाजपला १३ जागा मिळणार आहे. तर उरलेल्या दोन जागांवर काँग्रेस आणि जेडीएस जिंकणार आहे. त्यांनी सांगितले की आमचा पक्ष पुढील साडे तीन वर्षांसाठी आमचे सरकार राज्याचा समग्र विकास करणार आहे. आता आशा आहे की जेडीएस आणि काँग्रेस हे विरोधी पक्ष म्हणून आपली जबाबदारी पार पाडतील. भाजप सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहे. तसेच पुढील निवडणुकीत सुमार १५० जागा जिंकून पुन्हा सत्तेत येणार आहे. 

काय आहे जागांचे गणित 

सध्या कर्नाटकमध्ये २०७ सदस्य आहेत. बहुमतासाठी १०५ पेक्षा अधिक म्हणजे १०५ आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. आता १५ आमदार नव्यान निवडून आल्याने सदस्यांची संख्या २२२ होणार आहे. अशात भाजपला बहुमतासाठी ११२ सदस्यांची गरज आहे. त्यामुळे त्यांना आता केवळ ७ आमदारांची गरज आहे. तसेच झाल्यास भाजप सरकार तरणार आहे. सध्याचे कल पाहता येडियुरप्पा सरकार ही अग्निपरीक्षा पार करेल असे जवळपास नक्की झाले आहे. 

या जागांवर झाल्या निवडणुका 

गोकक, कागवाड, अथानी, येल्लपुरा, हिरेकेरूर, रवबेन्नुर, विजय नगर, चिकबल्लापुरा, केआरपुरा, यशवंतपुरा, महालक्ष्मी लायुत, शिवाजी नगर, होसकोटे, हंसुर आणि केआर पेटे  या विधानसभा जागांवर निवडणुका होणार आहे. तर मस्की आणि राजराजेश्वरी या ठिकाणी नंतर पोट निवडणुका होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी