कर्नाटक: BJP Yuva Morcha worker Praveen Nettaru was murdered: एका भाजप नेत्याची (BJP leader) हत्या करण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. कर्नाटकमध्ये (Karnataka) ही घटना घडली आहे. कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात भाजप युवा मोर्चाच्या (BJP Yuva Morcha) नेत्याची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. प्रवीण नेत्तरू (Praveen Nettru) असं मृत भाजप नेत्याचं नाव आहे. नेत्तरू हे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव होते. या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka Chief Minister Basavaraj Bommai) यांनी भाजप नेत्याच्या कुटुंबियांबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. तसंच नेत्तरू यांना लवकरच न्याय मिळेल असं आश्वासन दिलं.
अधिक वाचा- अजित पवार उद्यापासून अतिवृष्टीग्रस्त विदर्भ, मराठवाड्याच्या दौऱ्यावर
रूग्णालयात नेत असताना सोडला श्वास
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री नेत्तरू हे दुकान बंद करत होते. त्याचवेळी बाईकवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोर आले आणि त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात हल्लेखोरांनी त्यांच्यावर कुऱ्हाडी आणि तलवारीनं वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना तात्काळ रूग्णालयात नेण्यात आलं. मात्र रूग्णालयात जाण्याआधीच त्यांचा जीव गेला होता.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दुःख
या घटनेवर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दुःख व्यक्त केलं आहे. बोम्मई यांनी ट्वीट करत लिहिलं की, दक्षिण कन्नड जिल्ह्यातील आमच्या पक्षाचे कार्यकर्ता प्रवीण नेत्तारू यांची निर्घृण हत्या निषेधार्ह आहे. असे घृणास्पद कृत्य करणार्यांना लवकरच अटक करून कायद्यानुसार शिक्षा केली जाईल. प्रवीण यांच्या आत्म्यास शांती लाभो. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.
Karnataka CM Basavaraj Bommai condemns "the barbaric killing of party activist Praveen Nettaru from Sullia, Dakshina Kannada. The perpetrators of such a heinous act will be arrested soon & punished under the law. May Praveen's soul rest in peace." pic.twitter.com/LemY4LgUj3 — ANI (@ANI) July 26, 2022
रस्त्यावर भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन
दरम्यान, बेल्लारे पोलिसांनी या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. प्रवीण नेत्तारू हे बेल्लारे येथे दुकान चालवत होते. त्याचवेळी भाजप युवा मोर्चाचे नेते प्रवीण नेत्तारू यांच्या हत्येच्या निषेधार्थ अनेक भाजप कार्यकर्ते रात्री रस्त्यावर आंदोलनासाठी बसले. या हत्येप्रकरणी कार्यकर्त्यांनी आम्हाला न्याय हवाच्या घोषणा दिल्या.