Karnataka disqualified MLAs case: कर्नाटकतील १७ बंडखोर आमदार अपात्र, पण लढवू शकतात निवडणूक 

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 13, 2019 | 14:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

Karnataka disqualified MLAs case: कर्नाटकात अपात्र ठरविण्यात आलेले काँग्रेस आणि जेडीएसचे १७ आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. कोर्टाने विधानसभा अध्यक्षांचा निर्णय योग्य ठरवला आहे. 

karnataka disqualified mlas case all eyes on supreme court verdict news in marathi google newsstand
कर्नाटकतील १७ बंडखोर आमदार अपात्र, पण लढवू शकतात निवडणूक   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • कर्नाटकातील १७ आमदार अपात्र ठरविण्यात आले होते, यात काँग्रेसचे १४ आणि जेडीएसचे ३ आमदार आहे
  • १७ आमदारांना विधानसभेतून राजीनामा देऊन ६ वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवले होते. 
  • अपात्र ठरविलेल्या सर्व आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाविरूद्ध सुप्रीम कोर्टात आव्हान केले होते.  

नवी दिल्ली :  कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोर आमदारांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने आज निकाल दिला आहे. कोर्टाने आमदारांना अपात्र ठरविण्याचा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय योग्य ठरविला आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने हे पण म्हटले की अपात्र ठरविण्यात आलेल्या आमदारांना निवडणूक लढविण्याची परवानगी देली आहे. विधानसभा अध्यक्षांनी त्यांना ६ वर्षांसाठी निवडणूक लढविण्याची बंदी घातली होती. 

काँग्रेस आणि जेडीएसच्या तिकीटावर निवडणूक लढविलेल्या आमदारांची संख्या १७ आहे. त्यांनी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर तात्कालीन विधानसभा अध्यक्ष के आर रमेश कुमार यांनी सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यासाठी बंदी घातली होती. 

न्यायमूर्ती एन व्ही रमना, संजीव खन्ना आणि कृष्ण मुरारी यांच्या बेंचने बंडखोर आमदारांच्या याचिकेवर आज निकाल दिला.  या दरम्यान कोर्टाने म्हटले की नैतिकता सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांना लागू आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे पण म्हटले की, याचिकाकर्त्यांनी कोर्टाकडे आपली बाजू मांडली ती योग्य नाही. निकाल देताना न्यायमूर्ती एन व्ही रमना यांनी  सांगितले की विधानसभा अध्यक्षांचा निकाल कायम ठेवण्यात आलेला आहे. 

सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की अपात्र ठरलेले सर्व आमदार येत्या ५ नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभेच्या पोट निवडणुकीत आपले नशीब आजमावू शकतात. 

दरम्यान, या निकालाचा महाराष्ट्रातही दूरगामी परिणाम झाला आहे. त्यामुळे घोडेबाजाराची शक्यता असलेल्या महाराष्ट्रात दुसऱ्या पक्षात फुटून जाण्याची तयारी असलेल्या नवनिर्वाचित आमदारांनी या निकालाने धक्का बसला आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडून आलेल्या आमदारांना चेतावणी देत म्हटले होते की, यातील एकजरी आमदार फुटला तर त्यांच्याविरूद्ध सर्व पक्षांनी एकत्र येऊन उमेदवार देऊन आणि त्याला पाडू, त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे कोणत्याही पक्षातील आमदार फुटणार नाही, अशी शक्यता निर्माण झाली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी