कर्नाटकवर टिपू सुलतान राज्य करत असताना श्रीरंगपट्टणच्या हनुमान मंदिराचे जामिया मशिदीत रुपांतर

Karnataka: 'During Tipu Sultan rule Hanuman temple was converted into Jamia mosque in Srirangapatna' : कर्नाटकवर टिपू सुलतान राज्य करत असताना श्रीरंगपट्टणच्या हनुमान मंदिराचे जामिया मशिदीत रुपांतर करण्यात आले. ही घटना १७८४ मध्ये घडली. हनुमान मंदिराची मोडतोड करून या वास्तूचे रुपांतर मशिदीत करण्यात आले.

Karnataka: 'During Tipu Sultan rule Hanuman temple was converted into Jamia mosque in Srirangapatna'
कर्नाटकवर टिपू सुलतान राज्य करत असताना श्रीरंगपट्टणच्या हनुमान मंदिराचे जामिया मशिदीत रुपांतर  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कर्नाटकवर टिपू सुलतान राज्य करत असताना श्रीरंगपट्टणच्या हनुमान मंदिराचे जामिया मशिदीत रुपांतर
  • घटना १७८४ मध्ये घडली
  • हनुमान मंदिराची मोडतोड करून या वास्तूचे रुपांतर मशिदीत करण्यात आले

Karnataka: 'During Tipu Sultan rule Hanuman temple was converted into Jamia mosque in Srirangapatna' : श्रीरंगपट्टण : कर्नाटकमध्ये हिजाब आणि हलाल मांस प्रमाणपत्र हे दोन वाद असतानाच आता नवा मुद्दा पुढे आला आहे. कर्नाटकवर टिपू सुलतान राज्य करत असताना श्रीरंगपट्टणच्या हनुमान मंदिराचे जामिया मशिदीत रुपांतर करण्यात आले. ही घटना १७८४ मध्ये घडली. हनुमान मंदिराची मोडतोड करून या वास्तूचे रुपांतर मशिदीत करण्यात आले. हा मुद्दा काली मठाच्या ऋषी कुमार स्वामी यांनी मांडला आहे. 

श्रीरंगपट्टणच्या हनुमान मंदिराचे बांधकाम करताना होयसला साम्राज्याची प्रतिकं मंदिरात तयार करण्यात आली होती. यातली काही प्रतिकं आजही मशिदीत आहेत जी ओळखणे शक्य आहे. मशिदीचे बांधकाम टिपू सुलतानचे राज्य  असताना झाले. मंदिराची मोडतोड करून वास्तूचे रुपांतर मशिदीत करून त्यावेळी समाजावर अप्रत्यक्ष दहशत बसविण्यात आली. याच कारणामुळे जामिया मशिदीच्या विरोधात काली मठाच्या ऋषी कुमार स्वामी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

जानेवारी २०२२ मध्ये काली मठाचे ऋषी कुमार स्वामी जाहीरपणे जामिया मशिदीविरोधात बोलले. त्यावेळी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक पोलिसांनी त्यांना अटक केली होती. ही कारवाई झाली तरी काली मठाचे ऋषी कुमार स्वामी त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. 

कर्नाटकच्या मांड्या जिल्ह्यातील श्रीरंगपट्टण जनता दल धर्मनिरपेक्ष (Janata Dal Secular - JDS) या पक्षाचा बालेकिल्ला समजले जाते. या ठिकाणी काली मठाचे ऋषी कुमार स्वामी यांच्या आक्रमक भूमिकेनंतर वातावरण हळू हळू बदलत असल्याचे वृत्त आहे. अनेक हिंदू संघटना श्रीरंगपट्टणला कर्नाटकची अयोध्या मानतात. यामुळे या प्रकरणात पुढे काय घडणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.

कर्नाटकमध्ये काही मुस्लिम मुलींनी हिजाबला बंदी असेल तर शाळेत येणार नाही आणि परीक्षा देणार नाही, असा पवित्रा घेतला. शाळेत हिजाब घालूनच येणार असे त्या म्हणू लागल्या. कोर्टाने या प्रकरणात शाळेत गणवेष घालावा असा निर्णय दिला. हिजाब विरोधात निर्णय दिला गेला. राज्यात हलाल मांस प्रमाणपत्राला पण विरोध सुरू आहे. अलिकडेच भोंग्यांच्या मुद्याचा समावेश झाला आहे. कर्नाटकमध्ये रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत भोंगे अर्थात लाऊडस्पीकर आणि स्पीकर वापरण्यावर बंदी आहे. विना परवानगी भोंगे वापरण्यावरही बंदी आहे. ही प्रकरणे सुरू असतानाच आता श्रीरंगपट्टणच्या जामिया मशिदीचा मुद्दा पेटण्याची चिन्हं दिसत आहेत.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी