मुंबई : कर्नाटक राज्याची विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला. यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार हा प्रश्न कार्यकर्त्यांना होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या विनंतीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)कर्नाटक विधानसभा निवडणूक(Karnatak Assembly Election) घड्याळ चिन्हावर लढणार आहे. पक्षाकडून विनंती केल्यानंतर निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर कर्नाटक निवडणुक कोणत्या चिन्हावर निवडणुका लढणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होतं. अखेर निवडणूक आयोगाच्या (Election Commission)निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु हा निर्णय फक्त या निवडणुकीपुरता मर्यादित आहे.
अधिक वाचा : 12 आर्टमध्ये केली, आता पुढे काय करायचं प्रश्न पडलाय
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष आर हरी म्हणाले, आम्ही कर्नाटकमध्ये 46 जागांवर निवडणुका लढणार आहोत. आमचं चिन्ह फ्रिज झालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस कर्नाटक स्वबळावर लढणार आहे. आमच्याकडे सध्याचा भाजपचा आमदार दोन दिवसांपूर्वी आला आहे. त्यामुळे ताकद वाढणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता आम्हाला घडयाळ चिन्हावर निवडणूक लढता येणार आहे. कर्नाटक निवडणुकीसाठी कर्नाटकमध्ये शरद पवार (Sharad Pawar)यांच्या पाच ते सहा सभा घेण्यात येणार आहे. कर्नाटकात एकाच टप्प्यात मतदान आहे. 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
अधिक वाचा : आमचा Hitman दिसतोय नेता म्हणतोय पचास तोला
राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगानं काढून घेतला आहे. तृणमूल काँग्रेस, माकप या दोन पक्षांसह राष्ट्रवादी हा तिसरा पक्ष ठरलाय, ज्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काल आयोगानं काढून घेतला. 23 वर्षानंतर राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचा दर्जा आता महाराष्ट्र आणि नागालँड या दोन राज्यपुरता असणार आहे. 2014, 2019 च्या दोन लोकसभा निवडणुका आणि 2019 नंतर 21 पैकी 12 राज्यात जिथे राष्ट्रवादी लढली तिथल्या कामगिरीच्या आधारे निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे.