कर्नाटक: शुक्रवारी दीड वाजता कुमारस्वामी सिद्ध करणार बहुमत

लोकल ते ग्लोबल
Updated Jul 18, 2019 | 23:52 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

कर्नाटक विधानसभेतील वादानंतर शक्ती प्रदर्शन होणार होते. मात्र विधानसभेचे कामकाज शुक्रवारी साडे अकरा वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. या निर्णयाविरोधात भाजपचे आमदार संपूर्ण रात्रभर विधानसभेत मुक्काम करणार आहेत.

hd kumarswami
एच डी कुमारस्वामी 

मुंबई: कर्नाटकच्या विधानसभेत गुरूवारी विश्वासदर्शक ठरावारून वाद सुरू झाला. या वादानंतर कुमारस्वामी सरकारला मतदान करायचे होते. मात्र विधाननसभेचे कामकाज शुक्रवारी ११ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. याआधी भाजपच्या नेत्यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेतली होती आणि गुरूवारी मतदान करण्याची मागणी केली होती. मात्र याला नकार दिल्यानंतर भाजपच्या आमदारांनी विधानसभेतच रहायचे ठरवले. 

भाजपच्या आमदारांना मनवण्यासाठी काँग्रेसचे नेता डी शिवकुमार पोहोचले. मात्र त्यांचे प्रयत्न भाजप आमदारांनी हाणून पाडले. डी के शिवकुमार यांच्या मते भाजपचे आमदार मधु स्वामी म्हणाले सुप्रीम कोर्टाच्या मदतीने तुम्ही सरकारमध्ये टिकून आहात. आता सुप्रीम कोर्ट त्यांच्या बाजूने आहे. याचा अर्थ भाजप जाणून बुजून कोर्टाला या प्रकरणात अडकवत असून त्याचा अवमान करत आहे. 

या दरम्यान कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला म्हणाले, कुमारस्वामी सरकार शुक्रवारी दीड वाजता शक्ती परीक्षण करेल. 

कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर वाद आणि मतदान न झाल्याने बी एस येडियुरप्पाने एचडी कुमारस्वामी सरकारवर निशाणा साधला होता. ते म्हणाले, कुमारस्वामींना स्वत:ला हे नको हवे होते. कारण त्यांनी आधीच जनतेचा विश्वास गमावलाय. कर्नाटक आणि देशाच्या जनतेला माहीत आहे की काँग्रेस-जेडीएस गठबंधनला ९५ आमदारांचे समर्थन मिळाले आहे. तर भाजपकडे १०५ आमदार आहेत. 

या दरम्यान, काँग्रेसचे आमदार श्रीमंत पाटिल यांच्यावरून वाद झाला. काँग्रेसचे म्हणणे असे की त्यांच्या आमदाराचे अपहरण झाले. मात्र पाटिल यांनी स्वत: असे म्हटले की ते मर्जीने चेन्नईला गेले होते. ते तब्येत बिघडल्याने उपचारासाठी तेथे गेले होते आणि तेथून मुंबईला रवाना झाले. पाटिल यांना चेन्नईच्या एअरपोर्टवर पाहिले गेले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
कर्नाटक: शुक्रवारी दीड वाजता कुमारस्वामी सिद्ध करणार बहुमत Description: कर्नाटक विधानसभेतील वादानंतर शक्ती प्रदर्शन होणार होते. मात्र विधानसभेचे कामकाज शुक्रवारी साडे अकरा वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. या निर्णयाविरोधात भाजपचे आमदार संपूर्ण रात्रभर विधानसभेत मुक्काम करणार आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...