Anti-Conversion Law : कर्नाटकात धर्मांतरण विरोधी कायद आणणार, मुख्यमंत्री बोम्मई यांनी दिले संकेत

कर्नाटकात लवकरच धर्मांतरण कायदा होणार आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी याबद्दल संकेत दिले आहे. रविवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबद्दल माहिती दिली. धर्मांतरण विरोधी कायद्याचा मसुदा तयार असून लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत तो मंजूर केला जाईल. Karnataka government introduce Anti-Conversion bill cm basavaraj bommai

basavaraj bommai
बसवराज बोम्मई  
थोडं पण कामाचं
  • कर्नाटकात लवकरच धर्मांतरण कायदा होणार आहे.
  • मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी याबद्दल संकेत दिले आहे.
  • कायद्याचा मसुदा तयार झाला असून कायदा मंत्रालयाकडून या कायद्याची तपासणी सुरू

Anti-Conversion Law : बेंगळुरू : कर्नाटकात(Karnataka) लवकरच धर्मांतरण (Anti-Conversion Law)कायदा होणार आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (CM Basavaraj Bommai) यांनी याबद्दल संकेत दिले आहे. रविवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबद्दल माहिती दिली. धर्मांतरण विरोधी कायद्याचा मसुदा तयार असून लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत तो मंजूर केला जाईल आणि हिवाळी अधिवेशनात हा कायदा सादर केल जाईल असे बोम्मई म्हणाले. सोमवारपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार असून त्याच दिवशी मंत्रिमंडळाची बैठक होईल असे सांगण्यात येत आहे.

Karnataka government introduce Anti-Conversion bill cm basavaraj bommai

धर्म परिवर्तनाव बंदी घालावी अशी मागणी नागरिकांनी केल्याचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी म्हटले आहे. तसेच या कायद्याचा मसुदा तयार झाला असून कायदा मंत्रालयाकडून या कायद्याची तपासणी सुरू आहे. लवकरच या कायद्याला मंजूरी मिळेल आणि विधानसभेत या कायद्यावर चर्चा केली जाईल असे बोम्मई म्हणाले.

धर्म परिवर्तन समाजासाठी चांगले नाही असे बोम्मई म्हणाले, दलितांनी या धर्म बदलवणार्‍या लोकांपुढे झुकता कामा नये. कर्नाटक सरकार धर्म परिवर्तन रोखण्यासाठी नवीन कायदा आणत आहे. असे असले तरी धार्मिक समुदायांनी या कायद्याला घाबरण्याची गरज नाही असे बोम्मई यांनी स्पष्ट केले आहे.

हिंदू, शीख आणि ख्रिश्चन या सर्व धर्मांन संविधानिक मान्यता आहे. कुठल्याही धर्माच्या धार्मिक प्रथांन बाधा येणार नाही असे आश्वासन बोम्मई यांनी दिले आहे. तसेच देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर धर्म परिवर्तनावर वाद झाला आहे. अनेक राज्यांनी धर्मांतरण विरोधी कायदे बनवले आहेत असे बोम्मई म्हणाले. तर दुसरीकडे बंगळूरूमधील महाधर्मप्रांत आणि अनेक ख्रिश्चन संगठनांनी या कायद्याला विरोध दर्शवला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी