odd crime : मंदिराच्या दानपेटीत वापरलेले कंडोम टाकणाऱ्याला अटक

Karnataka: Man arrested for dropping used condoms in mandir temple donation boxes : येशूचा संदेश सांगण्यासाठी मंदिराच्या दानपेटीत वापरलेले कंडोम टाकणाऱ्या देवदास देसाई याला पोलिसांनी अटक केली.

Karnataka: Man arrested for dropping used condoms in mandir temple donation boxes
मंदिराच्या दानपेटीत वापरलेले कंडोम टाकणाऱ्याला अटक 
थोडं पण कामाचं
  • मंदिराच्या दानपेटीत वापरलेले कंडोम टाकणाऱ्याला अटक
  • येशूचा संदेश सांगण्यासाठी दानपेटीत टाकत होता कंडोम
  • ६२ वर्षांच्या देवदास देसाई याला अटक

Karnataka: Man arrested for dropping used condoms in mandir temple donation boxes : बंगळुरू : येशूचा संदेश सांगण्यासाठी मंदिराच्या दानपेटीत वापरलेले कंडोम टाकणाऱ्या देवदास देसाई याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी अटक केली तरी देवदास देसाई याला त्याच्या कृत्याचा पश्चाताप झालेला नाही. 

देवदास देसाई ६२ वर्षांचा आहे. तो मागील काही दिवसांपासून कर्नाटकमधील वेगवेगळ्या मंदिरांच्या दानपेटीत वापरलेले कंडोम टाकून जात होता. त्याने १८ मंदिरांच्या दानपेटीत कंडोम टाकल्याची कबुली दिली.

पोलिसांकडे आतापर्यंत पाच मंदिरांच्या प्रशासनाने दानपेटीत कंडोम आढळल्याची तक्रार केली आहे. तक्रारी आल्यामुळे मंदिरांचे सीसीटीव्ही फूटेज तपासून पोलिसांनी आरोपीचा चेहरा बघितला आणि त्याचा शोध सुरू केला. अखेर मंगळुरूतील एका गावातून पोलिसांनी देवदास देसाई याला अटक केली. देवदास देसाईने पोलिसांना कृत्याची कबुली देताना १८ मंदिरांच्या दानपेटीत कंडोम टाकल्याचे सांगितले. येशूचा संदेश सांगण्यासाठी मंदिराच्या दानपेटीत वापरलेले कंडोम टाकत असल्याचे देवदास देसाई म्हणाला. बायबलमध्ये येशूशिवाय दुसरा देव नाही असं म्हटलं आहे. मी कंडोम फेकतो कारण अशुद्ध वस्तू फक्त अशुद्ध ठिकाणीच टाकल्या पाहिजेत; असेही देवदास देसाई म्हणाला. 

देवदास देसाईने दिलेल्या कबुलीनुसार त्याने फक्त हिंदू धर्मियांची धार्मिकस्थळेच नाही तर इतर धर्मियांच्या धार्मिक स्थळांच्या दानपेट्यांमध्येही वापरलेले कंडोम टाकले आहेत. कंडोम टाकायचा आणि तुम्ही ज्या ठिकाणाला पवित्र आणि शुद्ध समजता ते अपवित्र आणि अशुद्ध आहे हे नागरिकांच्या मनात भिनवायचे. एकदा हे झाले की नागरिक हळू हळू त्यांचा धर्म सोडून ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करतील; असा विचार करुन देवदास देसाई दानपेट्यांमध्ये वापरलेले कंडोम टाकत होता. यासाठी त्याने कचरापेट्यांमध्ये टाकलेले वापरलेले कंडोम निवडून दानपेट्यांमध्ये टाकून द्यायला सुरुवात केली होती. 

येशूने मला ७० वर्षांचे आयुष्य दिले आहे आणि त्यापैकी ६२ वर्षांचे आयुष्य मी जगलो आहे; असे देवदास देसाईने पोलिसांना सांगितले. वैद्यकीय तपासणीत देवदास देसाईला कोणताही मानसिक आजार नसल्याचे आढळले; अशी माहिती पोलिसांनी दिली.

ऑटो चालवणारा देवदास देसाई जन्मापासून ख्रिस्ती आहे. त्याने वृद्धावस्थेत परिसरातील प्लॅस्टिक गोळा करुन भंगारवाल्याला विकण्यास सुरुवात केली. मागील काही आठवड्यांपासून तो अधूनमधून एखाद्या मंदिरात जाऊन वापरलेला कंडोम दानपेटीत टाकत होता. यासाठी त्याने जवळच्या कचरापेट्यांतून वापरलेले कंडोम निवडून घ्यायला सुरुवात केली होती; असे पोलिसांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी