Karnataka Politics: कर्नाटकमध्ये कुमारस्वामींची विश्वादर्शक ठराव घेण्याची मागणी

लोकल ते ग्लोबल
Updated Jul 12, 2019 | 17:15 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Karnataka Politics: राजकीय अस्थिरतेच्या वातावरणात कर्नाटक विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या पावसात मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची नौका बुडणार की, हे संकट पार करून पैलतिरी जाणार याची उत्सुकता आहे.

Karnataka Political crises
कर्नाटकमधील बंडखोर आमदारांची बस   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • कर्नाटकमध्ये राजकीय पेच कायम
  • कुमारस्वामींची विश्वादर्शक ठरावाला सामोरे जाण्याची तयारी
  • विधानसभा सभापतींकडून राजीनाम्यांवर अद्याप निर्णय नाही

बेंगळुरू : कर्नाटकमध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय पेच निर्माण झाला आहे. काठावर बहुमत असलेली काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दलाची आघाडी अचडणीत आली असून, मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांना विश्वासदर्शक ठरावाला समोरं जावं लागणार आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विधानसभा अध्यक्षांना ठरावाची वेळ ठरवण्याची विनंती केली आहे. मी सत्तेच्या खुर्चीला चिकटून बसण्यासाठी आलेलो नाही. माझी विधानसभा अध्यक्षांना विनंती आहे की, त्यांनी विश्वासदर्शक ठरावाची वेळ निश्चित करावी. मी कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहे, असे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले आहे. राजीनामा दिलेल्या आमदारांची समजूत घालण्याचा प्रयत्न सत्ताधारी आघाडीने केला आहे तर, भाजप या गोंधळात सत्तेची पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात आहे.

भाजपची धर्मनिरपेक्ष जनता दलाला ऑफर

कर्नाटकच्या राजकीय संकटात काल, वेगळे वळण लागले होते. भाजपने सत्ताधारी धर्मनिरपेक्ष जनता दलाला काँग्रेसशी आघाडी तोडून भाजपशी हातमिळवणी करण्याचा प्रस्ताव दिला होता. यासाठी भाजप आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या नेत्यांची बैठकही झाल्याची चर्चा होती. पण, मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी अशी कोणतीही शक्यता नसल्याचं जाहीर केलं आहे. कुमारस्वामी यांनी अजूनही सरकारला कोणताही धोका नसल्याचं म्हटलं आहे. तर काँग्रेस नेते अभिषेक मून सिंघवी यांनी राजीनामा देणाऱ्या आमदारांचा उद्देश वेगळा असल्याचा दावा केला आहे. काँग्रेसच्या १३, धर्मनिरपेक्ष दलाच्या तीन आणि आघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या दोन आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे कुमारस्वामी यांचे सरकार संकटात आले आहे.

राजीनाम्यावरून संभ्रम

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने काल विधानसभा सभापती रमेशकुमार यांना फटकारले आहे. बंडखोर आमदारांच्या बाजून वकील मुकुल रोहतगी यांन बाजू मांडली. त्यात सभापती सत्ताधारी पक्षाची बाजू घेत असल्याचा आरोप करण्यात आला. रमेश कुमार कोणताही निर्णय घेण्या ऐवजी पत्रकार परिषद घेत असल्याचे रोहतगी यांनी म्हटले आहे. अप्रत्यक्षपणे रमेशकुमार सर्वोच्च न्यायालयाला आव्हान देत असल्याचं बंडखोर आमदारांच्या वकिलांनी म्हटलं आहे. गुरुवारी बंडखोर आमदारांनी सभापती रमेश कुमार यांची भेट घेतली. त्यानंतर रमेश कुमार यांनी बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर तातडीने निर्णय घेणं शक्य नाही. कारण, त्यांचे राजीनामे योग्य पद्धतीने असले तरी, ते स्वैच्छिक आहेत की, त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे, हे तपासून घेतले पाहिजे. या सगळ्या राजकीय अस्थिरतेच्या वातावरणात कर्नाटक विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या पावसात मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची नौका बुडणार की, हे संकट पार करून कुमारस्वामी पैलतिरी जाणार याची उत्सुकता लागली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Karnataka Politics: कर्नाटकमध्ये कुमारस्वामींची विश्वादर्शक ठराव घेण्याची मागणी Description: Karnataka Politics: राजकीय अस्थिरतेच्या वातावरणात कर्नाटक विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या पावसात मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची नौका बुडणार की, हे संकट पार करून पैलतिरी जाणार याची उत्सुकता आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
भारतीय सैन्याची मोठी कारवाई, PoKमधील दहशतवादी तळं उद्धवस्त 
भारतीय सैन्याची मोठी कारवाई, PoKमधील दहशतवादी तळं उद्धवस्त 
रुग्णासोबत डॉक्टर महिलेचे शारीरिक संबंध, नंतर रुग्णावरच केला बलात्काराचा आरोप 
रुग्णासोबत डॉक्टर महिलेचे शारीरिक संबंध, नंतर रुग्णावरच केला बलात्काराचा आरोप 
[VIDEO]: महिलेला बेदम मारहाण, निर्वस्त्र करुन गावात फिरवलं
[VIDEO]: महिलेला बेदम मारहाण, निर्वस्त्र करुन गावात फिरवलं
PHOTOS: 'ती'  निवडणूक अधिकारी पुन्हा चर्चेत, विधानसभा निवडणुकीत सेल्फी
PHOTOS: 'ती'  निवडणूक अधिकारी पुन्हा चर्चेत, विधानसभा निवडणुकीत सेल्फी
[VIDEO]: हुबळी रेल्वे स्थानकात स्फोट, एक जण जखमी
[VIDEO]: हुबळी रेल्वे स्थानकात स्फोट, एक जण जखमी
लिव-इनमधील गर्लफ्रेंडच्या प्रेमाची परीक्षा घेण्यासाठी तरुणाने केलं असं काही की, तुम्हीही व्हाल हैराण
लिव-इनमधील गर्लफ्रेंडच्या प्रेमाची परीक्षा घेण्यासाठी तरुणाने केलं असं काही की, तुम्हीही व्हाल हैराण
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० ऑक्टोबर २०१९: धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल ते पंकजांची पहिली प्रतिक्रिया
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २० ऑक्टोबर २०१९: धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल ते पंकजांची पहिली प्रतिक्रिया
'निवडणुका असल्यावरच पाकिस्तानबाबत सर्जिकल पॅटर्न का होतो?' काँग्रेस नेत्याचा सवाल
'निवडणुका असल्यावरच पाकिस्तानबाबत सर्जिकल पॅटर्न का होतो?' काँग्रेस नेत्याचा सवाल