म्हणून त्याने महिलेचे दोन्ही कान कापले

लोकल ते ग्लोबल
Updated May 16, 2019 | 19:12 IST | टाइम्स नाऊ हिंदी

कर्नाटकाच्या कोलार जिल्ह्यातील एका महिलेचे कान कापल्याची घटना घडली आहे, पण असं काय घडलं की ज्यामुळे असं कृत्य आरोपीने केलं? जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर बातमी.

karnataka woman ear chopped
शेजाऱ्याने का कापले महिलेचे कान  |  फोटो सौजन्य: Getty Images

मुंबईः यंदा देशभरात उन्हाचा पारा भयंकर चढला आहे. वाढत्या तापमाणामुळे देशातील अनेक भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळसदृश्य परिस्थिती पाण्याची कमतरता भासत आहे. पाणी मिळविण्यासाठी कोरड्या विहीरीच्या तळाशी उतरून महिला पाणी भरत आहेत, तर काही ठिकाणी मैलो चालत पाण्याचा शोध घ्यावा लागतं आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दुष्काळाचा मारा झेलत असलेल्या लाेकांमध्ये पाण्यावरून भांडण होण्याच्या बातम्या समोर येत आहेत.

पाणी भरण्याच्या वादातून एका महिलेचे कान कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कर्नाटकच्या कोलार जिल्ह्यात ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. इंद्रायणी असे पीडित महिलेचं नाव असून त्या ४० वर्षीय आहेत.          

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ७ मे रोजी इंद्रायणी पाणी भरण्यासाठी सार्वजनिक नळावर गेल्या होत्या. ग्रामपंचायतीने घालून दिलेल्या नियमानुसार प्रत्येक एक व्यक्तिला ४ भांडी पाणी भरण्याची अनुमती आहे, पण त्या दिवशी इंद्रायणी यांच्या शेजारी राहणाऱ्या यशोधामा या ८ भांडी पाणी भरल्यानंतरही आणखी भांडी नळाखाली लावतच होत्या. त्यामूळे इंद्रायणी यांनी यशोधामाला हटकले. त्यानंतर यशोधामाने इंद्रायणीची भांडी नळाखालून फेकली. त्यामुळे दोघांमध्ये जोरदार वाद झाला. स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. यशोधामाचा पती होसारायप्पाही या भांडणामध्ये पडला त्यानेही इंद्रायनीला मारहाण केली. त्यानंतर ९ मे रोजी हल्ला झाला त्यावेळी इंद्रायणी आपल्या गुरांना चारा देण्यासाठी गेल्या होत्या. चारा दिल्यानंतर त्या गोठ्यातून घरी परतत होत्या तेव्हा रस्त्यात पाच लोकांनी त्यांना रस्त्यात गाठून त्यांच्यावर हल्ला केला. या पाच हल्लेखोरांमध्ये पीडित इंद्रायणी यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीचाही समावेश आहे.आरोपींनी धारदार हत्याराने इंद्रायणी यांचे दोन्ही कान कापले. यावेळी इंद्रायणी यांचा पती रघूपती याने तिचे प्राण वाचविले.

कूत्रा भूकला म्हणून त्याचा कान चावला

ही घटना पश्चिम बंगालमधील हूगली जिल्ह्यातील आहे. कुत्रा भुंकला म्हणून एका दारूड्याने चक्क त्याच्या कानाला चावा घेतल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी घडला होता. अरोपी व्यक्तीचे नाव शंभूनाथ धाली वय ३५ असे सांगण्यात येत आहे. तो हात मजदूर आहे. शंभूनाथला दारूच व्यसन असून रोज संध्याकाळी दारू पिने हा त्याचा नित्यक्रम. घटनेच्यावेळी ही तो नेहमी प्रमाणे दारू प्यायला आणि घरी परतत असताना रस्त्यातील कुत्रा भुंकला. कुत्रा भुंकल्याचा राग आल्याने त्या कुत्र्याचा कान चावला. उपस्थित नागरिकांनी दारूड्याला मारहाण करून कुत्र्याची सुटका केली. त्यानंतर स्थानिकांनी शंभुनाथला पोलिसांकडे सुपुर्त केलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
म्हणून त्याने महिलेचे दोन्ही कान कापले Description: कर्नाटकाच्या कोलार जिल्ह्यातील एका महिलेचे कान कापल्याची घटना घडली आहे, पण असं काय घडलं की ज्यामुळे असं कृत्य आरोपीने केलं? जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर बातमी.
Loading...
Loading...
Loading...