यादवीच्या दिशेने पाकिस्तानची वाटचाल

Kashmir National Party President Masarat Alam Bhat said Pakistan heading towards civil war : यादवीच्या दिशेने पाकिस्तानची वाटचाल सुरू आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील काश्मीर नॅशनल पार्टीचे अध्यक्ष  मसर्रत आलम भट यांनी ही भीती व्यक्त केली.

Pakistan heading towards civil war
यादवीच्या दिशेने पाकिस्तानची वाटचाल 
थोडं पण कामाचं
  • यादवीच्या दिशेने पाकिस्तानची वाटचाल
  • काश्मीर नॅशनल पार्टीचे अध्यक्ष  मसर्रत आलम भट यांनी व्यक्त केली भीती
  • पाकिस्तानमध्ये गोंधळाची स्थिती

Kashmir National Party President Masarat Alam Bhat said Pakistan heading towards civil war : लंडन : यादवीच्या दिशेने पाकिस्तानची वाटचाल सुरू आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील काश्मीर नॅशनल पार्टीचे अध्यक्ष  मसर्रत आलम भट यांनी ही भीती व्यक्त केली. ते शब्बीर चौधरी यांना यू टयुब चॅनलवर मुलाखत देत होते. 

मागील काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये वेगाने घडामोडी घडत आहेत. या घडामोडींमुळे पाकिस्तानमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. सरकार अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. इमरान खान यांनी पंतप्रधान असताना सरकार संकटात सापडल्याचे पाहून संसद विसर्जित केली. इमरान खान यांच्या पत्नीची एक मैत्रीण अचानक दुबईला निघून गेली. दुबईत गेलेल्या या महिलेवर आता पाकिस्तानमध्ये इमरान विरोधक लाच घेतल्याचे आरोप करत आहेत. इमरान खान त्यांच्या सर्व विरोधकांना देशद्रोही म्हणत आहेत. चिंतेची बाब म्हणजे राजकीय आरोप पंतप्रधान पदावरील व्यक्ती सरकारी भाषणामधून करत आहे.

पाकिस्तानमध्ये पेशावर आणि रावळपिंडी असा संघर्ष सुरू आहे. या संघर्षात कोणाची सरशी होणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्पष्ट होईल. पण हा निकालच संघर्षामुळे लांबणीवर पडत असल्याचे चित्र आहे, असे मसर्रत आलम भट म्हणाले. 

पाकिस्तानचे सर्वोच्च न्यायालय नॅशनल असेंब्लीचे डेप्युटी स्पीकर कासिम सूरी यांच्या कृतीवर प्रश्न उपस्थित करते. पण लगेच अंतिम निकाल देत नाही. पेशावर आणि रावळपिंडी हा संघर्ष सुरू आहे. या घडामोडी बघता यादवीच्या दिशेने पाकिस्तानची वाटचाल सुरू असल्याचे मसर्रत आलम भट म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी