Kashmir tourism काश्मीर: हॉटेल आणि हाऊसबोटीसाठी ४० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट

Kashmir tourism industry announces discounts जम्मू काश्मीरमध्ये सरकारी पर्यटन संस्थेने तसेच बहुसंख्य खासगी हॉटेल आणि हाऊसबोट मालकांनी ४० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट (सवलत) दिला आहे. दिवाळीचे निमित्त साधून डिस्काउंट (सवलत) ऑफर जाहीर करण्यात आली आहे.

Kashmir tourism industry announces discounts
काश्मीर: हॉटेल आणि हाऊसबोटीसाठी ४० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट 
थोडं पण कामाचं
  • काश्मीर: हॉटेल आणि हाऊसबोटीसाठी ४० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट
  • पर्यटकांच्या संख्येत वाढ
  • दल लेक येथे ओपन थिएटरचा प्रयोग

श्रीनगर: दहशतवाद आणि कोरोना संकटामुळे मंदावलेल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये सरकारी पर्यटन संस्थेने तसेच बहुसंख्य खासगी हॉटेल आणि हाऊसबोट मालकांनी ४० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट (सवलत) दिला आहे. दिवाळीचे निमित्त साधून डिस्काउंट (सवलत) ऑफर जाहीर करण्यात आली आहे. Kashmir tourism industry announces discounts

ऑफर जाहीर केल्यामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. मागील काही महिने अनेक हॉटेल, हाऊसबोटी इथे पर्यटकांचा जास्त वावर नव्हता. पण डिस्काउंट जाहीर झाला आणि पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून आली.

दल लेक (Dal Lake) येथे एक विशेष स्क्रीन बसवण्यात आला आहे. या स्क्रीनमुळे एकाच वेळी एक सिनेमा चार दिशांना असलेल्या प्रेक्षकांना दिसतो. हा स्क्रीन बसवल्यानंतर कश्मीर की कली (Kashmir Ki Kali) हा सिनेमा दाखवून शुभारंभ करण्यात आला. दल लेकमध्ये हाऊसबोटीत बसून सिनेमा बघण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली. पहिल्याच प्रयोगाला उत्साहवर्धक यश मिळाले. या प्रयोगामुळे दल लेकला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्यास मोठी मदत मिळाली.

डिस्काउंट (सवलत) ऑफर आणि दल लेक (Dal Lake) मधील ओपन थिएटरचा प्रयोग यामुळे हॉटेल आणि हाऊसबोटीसाठीच्या पर्यटकांच्या बुकिंगमध्ये लक्षणीय वाढ झाली. जम्मू काश्मीरमध्ये ९५ लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसचा पहिला डोस तर ५२ लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी लसचा दुसरा डोस घेतला आहे. 

सुरक्षित आणि आनंददायी पर्यटन जम्मू काश्मीरमध्ये शक्य असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नागरिकांचा सुरक्षा व्यवस्था आणि पर्यटनाच्या सोयीसुविधांवरील विश्वास वाढू लागला आहे. जम्मू काश्मीरच्या पर्यटनाला चालना मिळू लागली आहे. या परिस्थितीचा जम्मू काश्मीरच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास राज्यातील व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी