US:'सेल्फ हेल्प' गुरू कीथ रेनियरला १२० वर्षांची शिक्षा, महिलांना बनवत होता सेक्स स्लेव्ह

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 28, 2020 | 17:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

Nxivm sex cult founder sentenced:अमेरिकेतील स्वयंघोषित गुरू कीथ रेनियरला १२० वर्षांची शिक्षा मिळाली आहे. 

keith raniere
महिलांना सेक्स स्लेव्ह बनवणाऱ्या गुरू कीथ रेनियरला शिक्षा 

थोडं पण कामाचं

  • अमेरिकेन कोर्टाने कथित गुरू कीथ रेनियरला आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली
  • ६० वर्षीय रेनियरला १२० वर्षांची शिक्षा ठोठावली आहे
  • अनेक महिलांनी कीथवर आरोप लगावताना तक्रार दाखल केली होती

मुंबई: अमेरिकेत महिलांना सेक्स स्लेव्ह(sex slave) बनवल्याप्रकरणात अमेरिकेन कोर्टाने कथित गुरू कीथ रेनियरला(keith raniere) १२० वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. रेनियरने  Nxivm नावाची संघटना स्थापन केली होती यात महिलांना सेक्स स्लेव्ह बनवले जात आहे. या प्रकरणात त्याला कठोर शिक्षा सुनावण्यात आली आहे. कीथवर अनेक महिलांना फसवून त्यांना सेक्स स्लेव्ह बनवल्याचा तसेच त्यानंतर त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. त्याच्या फॉलोअर्समध्ये अनेक प्रसिद्ध आणि श्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे. 

न्यूयॉर्कमधील एका कोर्टाने कीथला या सर्व आरोपांमध्ये दोषी ठरवत आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली. ६० वर्षीय रेनियरला १२० वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. याचाच अर्थ त्याचे संपूर्ण आयुष्य आता तुरुंगात जाणार आहे. महिलांचा आरोप आहे की कीथ त्यांना सेक्स स्लेव्ह बनवत असे त्यानंतर त्यांचा लैंगिक छळ केला जात असे.

महिलांना जबरदस्ती सेक्स करायला लावत असे कीथ

कीथने Nxivm नावाची संघटना स्थापन केली होती. यात त्याच्याशिवाय सर्व महिला होत्या. या संघटनेत महिलांवर जनावरांप्रमाणे छळ केला जात असे. या संघटनेत सामील महिलांना जबरदस्ती कीथसोबत सेक्स करायला भाग पाडले जात असे. रिपोर्टनुसार तो आपल्या भक्तांकडू पाच दिवसांच्या सेशनसाठी ५००० डॉलर वसूल करत होता.

पैसेही घ्यायचा सोबत लैंगिक छळ करत असे

अनेक महिलांनी कीथवर आरोप लगावताना तक्रार दाखल केली होती. तसेच स्वयंघोषित गुरू कसा पैसे घ्यायचाहेही सांगितले होते. तसेच त्यामहिलांचे तो लैंगिक शोषणही करत असे. सेशनंतर महिलांना कीथसोबत सेक्स करणे अनिवार्य होते. 

कीथला शिक्षा सुनावण्याआधी त्याने मागितली माफी

कीथविरोधात एका १५वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचाही आरोप करण्यात आला होता. कोर्टाने पैसे हडपणे, सेक्स ट्रॅफिकिंगसारख्या अनेक आरोपांमध्ये तसेच एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपात त्याला १२० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. कीथला शिक्षा सुनावण्याआधी त्याने सर्व पीडितांची माफी मागितली. त्याने यावेळी आपल्यावरील आरोप कबूलच केले नाहीत तर स्वत:ला शिक्षा देण्यासाठी न्यायाधीशांकडे प्रार्थनाही केली. कोर्टात कीथविरोधात १५ लोकांनी साक्ष दिली यात १३ महिलांचा समावेश होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी