Amazon वरुन ऑनलाइन मागवले पासपोर्ट कव्हर आणि मिळाले असे काही की....

Kerala man orders passport cover on Amazon, receives original passport with product केरळमधील वायनाड जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला. मिथुन बाबू यांनी अॅमेझॉनवर पासपोर्ट कव्हरसाठी ऑर्डर नोंदवली. पण त्यांना पासपोर्ट कव्हर सोबत एका व्यक्तीचा पासपोर्ट मिळाला.

Kerala man orders passport cover on Amazon, receives original passport with product
Amazon वरुन ऑनलाइन मागवले पासपोर्ट कव्हर आणि मिळाले असे काही की.... 
थोडं पण कामाचं
  • Amazon वरुन ऑनलाइन मागवले पासपोर्ट कव्हर आणि मिळाले असे काही की....
  • अॅमेझॉनवरुन आयफोन मागवणाऱ्याला मिळाला डिश वॉशिंग बार
  • कस्टमर केअर विभागातील व्यक्तीने ही चूक पुन्हा होणार नाही, असे सांगितले

Kerala man orders passport cover on Amazon, receives original passport with product । वायनाड: केरळमधील वायनाड जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला. मिथुन बाबू यांनी अॅमेझॉनवर पासपोर्ट कव्हरसाठी ऑर्डर नोंदवली. पण त्यांना पासपोर्ट कव्हर सोबत त्रिशूरमधील कुन्नमकुलममध्ये राहणाऱ्या मुहम्मद सलीह यांच्या नावाने तयार केलेला एक पासपोर्ट मिळाला. 

मिथुन बाबू यांनी अॅमेझॉनच्या कस्टमर केअर नंबरवर फोन केला आणि घडलेला प्रकार सांगितला. धक्कादायक म्हणजे कस्टमर केअर विभागातील व्यक्तीने मिथुन बाबू यांना भविष्यात ही चूक पुन्हा होणार नाही, असे सांगितले. पण मिळालेल्या पासपोर्टचे काय करायचे याबाबत कोणतेही मार्गदर्शन केले नाही. 

आता मिथुन बाबू यांनीच पासपोर्टमधील पत्त्यावर संपर्क साधून मुहम्मद सलीह यांना पासपोर्ट मिळेल, अशी व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याआधी एका व्यक्तीने अॅमेझॉनवरुन आयफोन मागवला होता. पण त्या व्यक्तीला भांडी घासण्याचा साबण (डिश वॉशिंग बार) आणि पाच रुपयाचे नाणे मिळाले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी