Kerala News, Zomato Ordered To Pay Compensation To Law Student After Failing To Deliver Food : ऑर्डर केलेल्या 362 रुपयांच्या पदार्थांची डीलिव्हरी केली नाही म्हणून 'झोमॅटो'ला दंड झाला आहे. कोर्टाने 'झोमॅटो'ला दोषी ठरविले आहे. कंपनीने ग्राहकाला नुकसान भरपाई द्यावी असाही आदेश कोर्टाने दिला आहे.
झोमॅटो कंपनी फूड डीलिव्हरी सर्व्हिससाठी लोकप्रिय आहे. तसेच ही कंपनी वेगवेगळ्या कारणांमुळे वादात अडकण्यासाठीही प्रसिद्ध आहे. ग्राहकाने ऑर्डर केलेले पदार्थ पुरविण्याऐवजी स्वतःच खाण्याचा उद्योग झोमॅटोच्या कर्मचाऱ्याने केला होता. तसेच काही वेळा ऑर्डर केलेले पदार्थ आणण्याऐवजी अज्ञात ठिकाणावरून निकृष्ट दर्जाचे पदार्थ तयार करून घेऊन ते पुरविल्याच्या तक्रारी पण काही जणांनी कंपनी विरोधात केल्या आहेत. झोमॅटोच्या काही जाहिराती पण वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. ताज्या प्रकरणात ऑर्डर केलेल्या पदार्थांची डीलिव्हरी केलीच नसल्याची तक्रार झोमॅटो विरोधात झाली. हे प्रकरण कोर्टात पोहोचले आणि झोमॅटो कंपनीवर कारवाई झाली.
नवी मुंबईतील धक्कादायक घटनेचा Video !, लिफ्टमधून बाहेर पडताच तो कळवळत होता...
Zomato Ad Controversy: झोमॅटोने मागितली माफी, हृतिकची जाहिरात मागे घेतली
केरळमध्ये एका व्यक्तीने 362 रुपयांच्या पदार्थांची ऑर्डर केली होती. पण या पदार्थांची डीलिव्हरी झाली नाही. ऑर्डर करणाऱ्या व्यक्तीने झोमॅटोकडे तक्रार नोंदविली. पण झोमॅटोच्या अधिकाऱ्यांनी प्रश्न सोडविणे टाळले. अखेर ऑर्डर करणाऱ्याने झोमॅटो विरोधात कायदेशीर कारवाई केली. ऑर्डर केलेल्या 362 रुपयांच्या पदार्थांची डीलिव्हरी केली नाही म्हणून 'झोमॅटो'ला कोर्टाने दोषी ठरविले आणि दंड केला. ग्राहकाला भरपाई द्या असे कोर्टाने बजावले.
ग्राहकाने या प्रकरणात दीड लाख रुपयांची भरपाई मागितली होती. कोर्टाने दोषी ठरविल्यानंतर झोमॅटोने ग्राहकाला 8362 रुपयांची भरपाई देण्याची तयारी दाखविली आहे.
याआधी ग्राहकाने ऑर्डर देताना पत्ता व्यवस्थित सांगितला नाही, त्यामुळे डीलिव्हरी करण्यात अडचणी येत असल्याची भूमिका झोमॅटोच्या प्रशासनाने तसेच डीलिव्हरी बॉयने घेतली होती. पण कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून झोमॅटो विरोधात निर्णय दिला.
झोमॅटो ही सेवा क्षेत्रात कार्यरत असलेली बहुराष्ट्रीय भारतीय कंपनी आहे. फूड डीलिव्हरी सर्व्हिस पुरविण्याचे काम झोमॅटो करते. यासाठी कंपनीने स्वतःची वेबसाईट आणि अॅप लाँच केले आहे. झोमॅटो कंपनीची सुरुवात 2008 मध्ये झाली. फूडीबे नावाने कंपनी सुरू झाली. नंतर 2010 मध्ये कंपनीचे नामांतर झोमॅटो असे झाले. या कंपनीचा 2019 पर्यंत 24 देशांतील 10 हजारांपेक्षा जास्त शहरांमध्ये विस्तार झाला आहे.