green corridor : ५ तास ५० मिनिटांत ४०० किलोमीटर धावली अॅम्बुलन्स, वाचले तान्हुल्याचे प्राण

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 18, 2019 | 18:31 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Green Corridor : केरळ सरकार आणि तेथील जनतेने मिळून एका पंधरा दिवसांच्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी अॅम्बुलन्सला ५ तास ५० मिनिटांत ४०० किलोमीटर अंतर कापून देण्यात यश आले आहे. बाळावर कोचीमध्ये उपचार सुरू आहेत.

Kerala successful green corridor for 15 days old boy ambulance 400 km in 5.5 hours
केरळमध्ये चिमुकल्यासाठी धावली सगळी यंत्रणा   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • केरळमध्ये ४०० किलोमीटर यशस्वी ग्रीन कॉरिडॉर
  • पंधरा दिवसांच्या बाळाला पोहचविले कोचीमधील रुग्णालयात
  • केरळ पोलिसांना, नागरिकांनचे उत्स्फूर्त सहकार्य

कोची : केरळ सरकार आणि तेथील सामान्य जनतेने मिळून एक असामान्य काम केले आहे. एका अॅम्बुलन्सला ५ तास ५० मिनिटांत ४०० किलोमीटर अंतर कापून देण्यात यश आले आहे. या कामगिरीमुळं अवघ्या १५ दिवसांच्या तान्हुल्या बाळाचा जीव वाचला आहे. संबंधित मूल जन्मतः हृदयरोगी होते. त्याच्यावर लवकरात लवकर उपचार गरजेचे होते. त्याच्यासाठी ग्रीन कॉरीडॉर करण्यात आला. या कॉरिडॉरमधून अॅम्बुलन्सने ३५० मिनिटांत ४०० किलोमीटर अंतर पार केले.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, केरळच्या उत्तरेकडील कासरगोड जिल्ह्यात एका रुग्णालयात जन्मलेल्या एका बाळाला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्याला मेंगलुरूच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या बाळाची किडनीदेखील नीट काम करत नव्हती आणि त्याच स्थितीत त्याला निमोनियाही झाला होता. त्याच्या आई-वडिलांनी आपल्या मुलासाठी एका धाडसी प्रवासाची तयारी दाखवली. हा प्रवास तिरुवनंतपुरमसाठी होता. तेथे आरोग्य सुविधा अधिक चांगल्या आणि स्वस्त असल्यामुळे तेथे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी स्वतः लक्ष घातल्यानंतर तातडीने एक ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला. ज्यावर स्वतः मुख्यमंत्र्यांनी फेसबुकच्या माध्यातून जनतेला कॉरिडॉरसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. नागरिकांनी रस्त्यावरील गर्दी कमी करून अॅम्ब्युलन्सला वाट करून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

मुलाची तब्येत आणखी बिघडण्याचा धोका असल्याने स्थानिक डॉक्टरांनी त्याला कोचीच्या रुग्णालयात हलवण्यास सुचविले होते. केरळ सरकारनेही त्या मुलावर उपचार करण्याची जबाबदारी उचलली. आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी मुलाच्या आई-वडिलांशी चर्चा केली आणि मुलाला कोचीला घेऊन जाण्यास सहमती दर्शवली. त्यानंतर ग्रीन कॉरिडॉर करण्याचे चांगले नियोजन करण्यात आले.

त्यात पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग, रस्ते वाहतूक विभाग आणि नागरिकांनी चांगले काम करून संबंधित मुलाला कोचीच्या रुग्णालयात वेळेत आणि सुखरूप पोहचवले. संबंधित मुलाच्या आई-वडिलांचे नाव अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, कोचीमधील रुग्णालयात त्या मुलावर तातडीने उपचार सुरू करण्यात आल्याचे केरळ सरकारकडून सांगण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
green corridor : ५ तास ५० मिनिटांत ४०० किलोमीटर धावली अॅम्बुलन्स, वाचले तान्हुल्याचे प्राण Description: Green Corridor : केरळ सरकार आणि तेथील जनतेने मिळून एका पंधरा दिवसांच्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी अॅम्बुलन्सला ५ तास ५० मिनिटांत ४०० किलोमीटर अंतर कापून देण्यात यश आले आहे. बाळावर कोचीमध्ये उपचार सुरू आहेत.
Loading...
Loading...
Loading...