मान्सून ४ जूनला केरळात येणार, स्कायमेटचा अंदाज

लोकल ते ग्लोबल
Updated May 15, 2019 | 08:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

खासगी हवामान संस्था स्कायमेटनं या वर्षी मोसमी पाऊस (मान्सून) संदर्भात भविष्यवाणी केली आहे. केरळमध्ये मान्सून ४ जूनला धडकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशमध्ये चांगला पाऊस पडेल

Monsoon
मान्सून ४ जूनला केरळात येणार, स्कायमेटचा अंदाज  |  फोटो सौजन्य: PTI

Monsoon this year will come around 4th june: मान्सून संदर्भात भविष्यवाणी करणारी खासगी हवामान संस्था स्कायमेटनं मंगळवारी यंदाच्या मान्सूनबद्दल माहिती दिली आहे. येत्या ४ जूनला मान्सून केरळमध्ये धडकणार असल्याची शक्यता स्कायमेटनं वर्तवली आहे. केरळमध्ये मान्सूनची सुरूवात होण्याची तारीख एक जून आहे. भारतीय हवामान विभागानं अद्याप अंदाज जाहीर केलेले नाहीत. स्कायमेटनं सांगितलं की, देशभरात मान्सून सरासरीपेक्षा कमी पडेल. स्कायमेटचे सीईओ जतिन सिंह यांनी सांगितलं की, अंदमान आणि निकोबारद्वीप समूहात मान्सूनचे आगमन २२ मे रोजी होण्याची शक्यता आहे. यावर्षी देशाच्या चारही प्रमुख विभागांत सामान्यपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. तर दक्षिण पश्चिम मान्सून २०१९ केरळात चार जूनला धडकण्याची शक्यता आहे.  

सिंह यांनी पुढे म्हटले की, पूर्व तसंच ईशान्य भारतात ९२ टक्क्यांपर्यंत पावसाची शक्यता आहे. स्कायमेटनुसार, मान्सून सरासरीपेक्षा कमी होण्याची शक्यता ५५ टक्के आहे. त्यामुळे त्याचा परिणाम अल नीनोवर पडेल. याव्यतिरिक्त, सर्व उत्तर भारतातील राज्यात उत्तर पश्चिम भारतात लॉन्ग पीरियड एवरेज (एलपीए) ची ९६ टक्के मान्सून होईल. जो की सामन्य आणि सरासरीपेक्षा कमी होईल. 

स्कायमेटनं सांगितलं की, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली-एनसीआरमध्ये पावसाचं प्रमाण कमी असेल. 

महाराष्ट्रातला सांगायचं झाल्यास, राज्यात पावसाला सुरूवात थोडी उशीरानेच होईल. १० जूननंतर मान्सून मुंबईत दाखल होणार असला तरी, जूनमध्ये राज्यात पावसाची शक्यता कमी आहे. तर जुलै महिन्यात दुसऱ्या आठवड्यापासून मान्सूस राज्यात सक्रिय होण्याची शक्यता आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार, देशाप्रमाणेच राज्यातही सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल असं स्पष्ट दिसतंय. 

मध्य भारतात एलपीएच्या ९१ टक्केच पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये पाऊस होण्याची शक्यता स्कायमेटनं वर्तवली आहे. यामुळे मराठवाडा आणि गुजरातच्या काही भागांमध्ये परिस्थिती वाईट होऊ शकते. स्कायमेटनं सांगितलं की, कर्नाटकच्या उत्तरेस आणि रायलसीमामध्ये कमी पाऊस पडणार आहे. केरळ आणि कर्नाटकाची किनारपट्टी वगळता दक्षिणेकडील राज्यांमध्येही चांगल्या पावसाची शक्यता नसल्याचं स्कायमेटचा अंदाज आहे.

दरम्यान गेल्या वर्षी स्कायमेटनं विदर्भ आणि मराठवाड्यात ९७ टक्के पावसाची शक्यता व्यक्त केली होती. मात्र त्यावेळी ९१ टक्केच पाऊस झाला होता. त्यामुळे राज्यासह देशाच्या अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी