Kerobokan Jail: इंडोनेशियाचा हा तुरुंग 'पृथ्वीवरचा नरक', ड्रग्जमध्ये अटक झाल्यास मिळते क्रुर शिक्षा

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 17, 2023 | 10:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

इंडोनेशियामधील केरोबोकन तुरुंग. या तुरुंगाचं नाव काढलं तरी भल्याभल्यांना घाम फुटतो, अनेकांची बोबडी वळते, त्याच कारण म्हणजे इथली क्रुर शिक्षा. इंडोनेशियातील अंमली पदार्थ तस्करांना इथं कठोर शिक्षा भोगावी लागते.

Kerobokan jail in Indonesia worst jail in the world
इंडोनेशियाचा हा तुरुंग 'पृथ्वीवरचा नरक', ड्रग्जमध्ये अटक झाल्यास मिळते क्रुर शिक्षा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जगातील सर्वात धोकादायक तुरुंग कोणतं?
  • इंडोनेशियामधील केरोबोकन तुरुंग. या तुरुंगाचं नाव काढलं तरी भल्याभल्यांना घाम फुटतो
  • या तुरुंगातील सुमारे 80 टक्के कैदी अंमली पदार्थांच्या आरोपाखालील आहेत.

Kerobokan Jail in Indonesia: जगातील सर्वात धोकादायक तुरुंग कोणतं? याचं उत्तर अखेरीस मिळालं, आहे. इंडोनेशियामधील केरोबोकन तुरुंग. या तुरुंगाचं नाव काढलं तरी भल्याभल्यांना घाम फुटतो, अनेकांची बोबडी वळते, त्याच कारण म्हणजे इथली क्रुर शिक्षा. इंडोनेशियातील अंमली पदार्थ तस्करांना इथं कठोर शिक्षा भोगावी लागते. या तुरुंगातील सुमारे 80 टक्के कैदी अंमली पदार्थांच्या आरोपाखालील आहेत. (Kerobokan jail in Indonesia worst jail in the world)

ब्रिटनची लिंडसे सँडिफर्ड जवळपास एक दशकापासून या तुरुंगात क्रूर शिक्षा भोगत आहे. गोळीबार पथकाकडून गोळ्या खाण्यासाठी ती आपले शेवटचे दिवस मोजत आहेत. 2013 मध्ये तिला 1.6 दशलक्ष पौंड कोकेनच्या तस्करीत पकडण्यात आले होते. तेव्हायापासून तिला या तुरुंगात ठेवण्यात आले आहे. तिची शेवटची इच्छा फक्त मरणाची आहे. तिच्याप्रमाणे तुरुंगातील बहुतेक कैदी मृत्यूची वाट पाहत आहेत. 

अधिक वाचा: Dubai Fire : दुबईत इमारतीला आग, 4 भारतीयांसह 16 जणांचा मृत्यू

बालीचे हे केरोबोकन तुरुंग सर्वात कुप्रसिद्ध तुरुंगांपैकी एक आहे. 1979 मध्ये 357 जणांसाठी बांधण्यात आलेले कारागृह सध्या 1000 हून अधिक कैदी असल्यामुळे येथे अनेक कैद्यांना एका क्वार्टरमध्ये ठेवले जाते. कारागृहातील क्रूर परिस्थितीमुळे अनेकवेळा कैद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असून त्यात ते यशस्वीही झाले आहेत. 2017 मध्ये चार कैदी कारागृहातून पळाले होते. त्यासाठी त्यांनी कारागृहात बोगदा खोदला होता. 1999 मध्ये कैद्यांनी गाद्याला आग लावली होती, त्यात शेकडो कैदी पळून गेले होते. 

अधिक वाचा: Dogs Attack on youth: तरुणावर 10 ते 12 मोकाट कुत्र्यांचा हल्ला; युवकाचा जागीच मृत्यू

130 कैदी मृत्यूच्या प्रतीक्षेत आहेत

इंडोनेशियामध्ये फाशीची शिक्षा अत्यंत दुर्मिळ आहे, त्यामुळे बहुतेक कैदी 10 वर्षांहून अधिक काळ फाशीच्या शिक्षेची वाट पाहत आहेत. इथे शेवटची फाशीची शिक्षा 2015 मध्ये झाली होती. लिंडसेसह 130 लोक सध्या मृत्यूच्या प्रतिक्षेत आहेत. इंडोनेशियातील शिक्षा अत्यंत क्रूर असून फाशीची पद्धत अत्यंत भीषण आहे. शिक्षा झालेल्या कैद्याला गोळीबार पथकाकडे नेले जाते. कैदी बसणे किंवा उभे राहणे निवडू शकतात कारण सशस्त्र सैनिक त्यांच्या हृदयावर निशाणा लावतात. जर एखादा कैदी गोळीबारातून वाचला तर कमांडर त्याच्या डोक्यात गोळी मारतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी