EWS Reservation : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल...तर लक्षात ठेवा या 5 गोष्टी

EWS Reservation conditions : नोकऱ्यांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने (EWS Reservation) वैध ठरवला आहे. हा निर्णय देताना खंडपीठाने आपले मत स्पष्ट केले आले. हे धोरण वर्षापूर्वी लागू करण्यात आले असले, तरीही समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना पात्रता आणि लाभ याबाबतीत संभ्रम आहे. सामान्य श्रेणीतील जी व्यक्ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना अंतर्गत येते, ती त्याच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नावर अवलंबून असते.

EWS Reservation
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण 
थोडं पण कामाचं
  • सर्वोच्च न्यायालयाकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या आरक्षणाला मंजूरी
  • या आरक्षणासाठीच्या विविध अटी
  • आरक्षणाचा लाभ घेताना लागणारी कागदपत्रे

Eligibility of EWS Reservation : नवी दिल्ली : आज आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मंजूरी दिली आहे. नोकऱ्यांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने (EWS Reservation) वैध ठरवला आहे. हा निर्णय देताना खंडपीठाने आपले मत स्पष्ट केले आले.  हे धोरण वर्षापूर्वी लागू करण्यात आले असले, तरीही समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना पात्रता आणि लाभ याबाबतीत संभ्रम आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने भारतीय संविधानात 103 वी दुरुस्ती करून 2019 मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचा कोटा आणला. घटनेच्या कलम 15 मधील कलम 6 आणि कलम 16 मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या कोट्याची तरतूद जोडण्यात आली. या तरतुदीनुसार आर्थिकदृष्ट्या कमकुवत सर्वसाधारण वर्गाला शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची सुविधा मिळणार आहे. (Key points to be considered while taking benefit of EWS reservation)

अधिक वाचा : Raigad accident: मुंबई-गोवा महामार्गावर ट्रेलर पलटी, अपघातामुळे वाहतुकीवर परिणाम, VIDEO

हे आरक्षण खाजगीसह कोणत्याही शैक्षणिक संस्थेद्वारे लागू केले जाऊ शकते. अर्थात हे आरक्षण लागू करताना अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना दुरुस्तीतून सूट देण्यात आली आहे. यापुढे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र हे उत्पन्नाच्या प्रमाणपत्रासारखेच असणार आहे. यातून त्या व्यक्तीची उत्पन्नाची स्थिती दिसणार आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणासंदर्भातील 5 महत्त्वाचे मुद्दे-

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा प्रमुख लाभार्थी कोण?

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या आरक्षणाचा कोटा आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांच्या सामान्य श्रेणीसाठी जात आणि वर्गावर आधारित आरक्षण देतो. सामान्य श्रेणीतील जी व्यक्ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना अंतर्गत येते, ती त्याच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नावर अवलंबून असते. यासाठीच्या उत्पन्नाच्या अटीनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या कोट्यात येणाऱ्या व्यक्तीसाठी, त्याच्या कुटुंबाचे उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे. त्याच्या उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये शेती, व्यवसाय आणि इतर व्यवसायांचाही समावेश करण्यात आला आहे.

अधिक वाचा : Chandra Grahan 2022: चंद्रग्रहणात करा 'या' गोष्टींचे दान, सर्व दुःखातून मिळेल मुक्ती; लवकरच मिळेल मनासारखी नोकरी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या आरक्षणासाठीच्या मालमत्तेवरील अटी 

EWS कोट्यात येणाऱ्या लोकांसाठी काही बंधनकारक अटी देखील आहेत. या श्रेणी अंतर्गत या आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीकडे 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन असणे आवश्यक आहे. याशिवाय त्या व्यक्तीची निवासी सदनिका 200 चौरस मीटर किंवा त्यापेक्षा जास्त नसावी. निवासी सदनिका 200 चौरस मीटरपेक्षा जास्त असल्यास ती पालिकेच्या क्षेत्राच्या अखत्यारीत येऊ नये.

EWS आरक्षण कुठे मिळणार

EWS आरक्षण सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करताना सूट देते. या आरक्षणाद्वारे शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये  आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या कोट्याअंतर्गत 10 टक्के आरक्षण असेल.

EWS साठीचे प्रमाणपत्र

एखाद्या व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या  आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्याच्याकडे 'उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र' असणे आवश्यक आहे. लक्षात घ्यायची बाब म्हणजे हे प्रमाणपत्र फक्त तहसीलदार किंवा त्यावरील दर्जाच्या राजपत्रित अधिकाऱ्यांनी जारी केले पाहिजे. शिवाय हे उत्पन्न प्रमाणपत्र फक्त एक वर्षासाठी वैध असणार आहे. या आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांना  दरवर्षी त्यांच्या प्रमाणपत्रांचे नूतनीकरण करावे लागणार आहे.

अधिक वाचा : Abdul Sattar: कृषीमंत्र्यांकडून सुप्रिया सुळेंना शिवीगाळ, पन्नास खोके... एकदम ओक्केवरून अब्दुल सत्तार चिडले

प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे

अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
आधार कार्ड
ओळखपत्र किंवा पॅन कार्ड
हायस्कूल किंवा पदवीची गुणपत्रिका
कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र
मूळ पत्त्याचा पुरावा
बँकेचे पासबुक
प्रतिज्ञापत्र

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी