Amritpal Singh Arrest: पंजाब पोलिसांनी खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगला त्याच्या 6 साथीदारांसह अटक केली. तणावाच्या परिस्थितीमध्ये परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, पंजाबमधील अनेक भागात मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. (Khalistan supporter Amritpal singh arrested by the Punjab Police)
अधिक वाचा : PM Modi : पंतप्रधान मोदी जनतेशी संवाद साधणार, महत्त्वाच्या विषयावर बोलणार
पंजाब पोलिसांनी 'वारीस पंजाब दे'चा प्रमुख अमृतपाल याला नकोदरजवळून ताब्यात घेतले आहे. यापूर्वी पोलिसांनी अमृतपालच्या 6 साथीदारांना अटक केली होती. त्यानंतर अमृतपाल फरार झाला होता, त्याला पकडण्यासाठी अनेक पोलिसांचे पथक लागले होते. अटक करण्यात आलेल्या लोकांकडून पोलिसांनी शस्त्रे आणि 2 वाहने जप्त केल्याचे सांगण्यात येत आहे.
अधिक वाचा : या देशात खातात सगळ्यात लांब चपाती !
यासोबतच पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये रविवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. अमृतपाल सिंग यांच्यावर 3 गुन्हे दाखल आहेत, त्यापैकी 2 द्वेषपूर्ण भाषणाशी संबंधित आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धरमकोटजवळील महितपूर पोलिस स्टेशनजवळ पोलिसांनी या 6 जणांना अटक केली आहे.