खलिस्तानी दहशतवाद्यांनी नांदेडमध्ये आरडीएक्स पोहोचविल्याची दिली माहिती, तपास सुरू

Khalistani terrorist delivered RDX to Nanded, investigation underway : हरयाणात चार खलिस्तानी दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. या दहशतवाद्यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये अमृतसर येथील तरणतार रोड आणि मार्च २०२२ मध्ये महाराष्ट्रातील नांदेडमध्ये आरडीएक्स पोहचविल्याची माहिती दिली आहे.

Khalistani terrorist delivered RDX to Nanded, investigation underway
खलिस्तानी दहशतवाद्यांनी नांदेडमध्ये आरडीएक्स पोहोचविल्याची दिली माहिती, तपास सुरू 
थोडं पण कामाचं
  • खलिस्तानी दहशतवाद्यांनी नांदेडमध्ये आरडीएक्स पोहोचविल्याची दिली माहिती, तपास सुरू
  • ऑक्टोबर २०२१ मध्ये अमृतसर येथील तरणतार रोड आणि मार्च २०२२ मध्ये महाराष्ट्रातील नांदेडमध्ये आरडीएक्स पोहचविले
  • दहशतवाद्यांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्रातून एटीएसचे पथक हरयाणाला जाणार

Khalistani terrorist delivered RDX to Nanded, investigation underway : नवी दिल्ली : हरयाणात चार खलिस्तानी दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. या दहशतवाद्यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये अमृतसर येथील तरणतार रोड आणि मार्च २०२२ मध्ये महाराष्ट्रातील नांदेडमध्ये आरडीएक्स पोहचविल्याची माहिती दिली आहे. ही माहिती मिळताच महाराष्ट्र एटीएसने तपास सुरू केला आहे. नांदेडमध्ये पोहोचविण्यात आलेले आरडीएक्स पुढे कुठे पाठविण्यात आले आणि त्याचा उपयोग कोणत्या ठिकाणी होणार आहे याचाही तपास सुरू आहे. 

मुंबईत रेल्वेमध्ये साखळी बॉम्बस्फोट करण्यासाठी खलिस्तानी दहशतवादी स्लीपर सेलच्या माध्यमातून मुंबईत आरडीएक्स आणून वापरण्याची योजना आखत होते. पण ही योजना अंमलात येण्याआधीच चार दहशतवाद्यांना अटक झाली. हे दहशतवादी खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंह उर्फ रिंदा याच्या संघटनेसाठी काम करत असल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे. हरविंदर सिंह पकिस्तानमध्ये राहून भारतविरोधी कारवाया करत असतो. त्याच्या कटाची धक्कादायक माहिती चार दहशतवाद्यांच्या अटकेनंतर उलगडू लागली आहे. 

अटक केलेले चार दहशतवादी सिग्नल अॅप वापरून एकमेकांच्या संपर्कात होते. दहशतवादी नांदेडमध्ये आणखी आरडीएक्स लवकरच नेणार होते. पण त्याआधीच दहशतवाद्यांना अटक झाली. हरयाणात अटकेत असलेल्या दहशतवाद्यांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्रातून एटीएसचे पथक हरयाणाला जाणार असल्याचे वृत्त आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी