चीनमध्ये आता आणखी एक नवीन व्हायरस, 'Hantavirus'मुळे एकाचा मृत्यू, जाणून घ्या याचे लक्षणं

लोकल ते ग्लोबल
Updated Mar 24, 2020 | 19:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

Hantavirus (New Virus) in China: कोरोना व्हायरसच्या संक्रमणाशी लढा देत असलेल्या चीनमध्ये आता एक नवं प्रकरण समोर आलंय. हे काळजीचं कारण आहे. ‘हंता व्हायरस’मुळे एकाचा चीनमध्ये मृत्यू झालाय. जाणून घ्या याबद्दल...

Hantavirus
चीनमध्ये आता एक नवीन व्हायरस, 'Hantavirus'मुळे एकाचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • चीनमध्ये कोरोना व्हायरसनंतर आता हंताव्हायरसमुळे एका व्यक्तीचा मृत्यू
  • हंता व्हायरस उंदीर आणि खारू ताईमुळे पसरतोय, माणसाकडून माणसाकडे संक्रमित होत नाही.
  • जाणून घ्या हंताव्हायरसचे लक्षणं आणि उपाय

बीजिंग, चीन: चीनच्या वुहान शहरामध्ये कोरोना व्हायरसचं प्रकरण समोर आल्यानंतर त्यांचा प्रकोप वाढत गेला. आज जगातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसचं संक्रमण बघायला मिळतंय. या जीवघेण्या परिस्थितीमध्ये आणखी एक भीतीदायक बातमी येतेय. चीनमध्ये आता एक नवा व्हायरस समोर आलं आहे. त्याचं नाव 'हंता व्हायरस' (Hantavirus) असं आहे. चीनच्या युन्नान प्रांतात याच हंता व्हायरसमुळे एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

चीनच्या सरकारी वृत्तपत्रात ग्लोबल टाइम्स (Global Times) मध्ये ही बातमी दिलीय. त्यानंतर सोशल मीडियावर खूप गोंधळ सुरू झालाय. ग्लोबल टाइम्सनुसार मृत व्यक्ती कामासाठी बसनं शांडोंग प्रांतात जात होता, यादरम्यान त्याचा मृत्यू झाला. जेव्हा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला तेव्हा हंता व्हायरसची पॉझिटिव्ह टेस्ट मिळालीय. यानंतर सुरक्षेच्या दृष्टीनं बसमध्ये असलेल्या इतर ३२ प्रवाशांची टेस्ट केली गेलीय.

सोशल मीडियावर ही माहिती समोर येताच जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय आणि लोकं आता घाबरत आहेत की, हा व्हायरस कोरोना व्हायरससारखा महामारी न होवो.

हंता व्हायरस म्हणजे काय?

रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्रांनुसार (CDC) हंता व्हायरसचं एक कुटुंब आहे. हा व्हायरस उंदरांमुळे पसरतो आणि लोकांमध्ये अनेक आजार उत्पन्न करण्यासाठी कारणीभूत ठरतो. तज्ज्ञांनुसार कोरोना व्हायरससारखा हंता व्हायरस प्राणघातक नाहीय आणि उंदीर, खारू ताईच्या संपर्कात मनुष्य आला तर हा व्हायरस पसरतो.

सोबतच हंता व्हायरस एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होत नाही, मात्र जर कुणी व्यक्ती उंदरांची विष्ठा, मूत्र इत्यादींना स्पर्श करत असेल आणि त्याच हातानं आपल्या नाका-तोंडाला स्पर्श करत असेल तर हंता व्हायरस होण्याचं संकट वाढतं आणि हे लोक त्याच्या संक्रमणाखाली येऊ शकतात.

हे लक्षणं दिसत असतील तर समजा ‘हंताव्हायरस’

तज्ज्ञांच्या मते ‘हंताव्हायरस’मुळे संक्रमित झाले असाल तर याचे काही खास लक्षणं दिसतात. सुरुवातीचे लक्षणं म्हणजे थकवा, ताप आणि मसल्स पेन यासोबतच डोकेदुखी, चक्कर येणं, थंडी वाजणं आणि पोटोच्या समस्यांचा समावेश आहे.

जर उपचारांमध्ये उशीर झाला तर संक्रमित व्यक्तीच्या आतड्यांमध्ये पाणी भरतं, त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. जर त्या व्यक्तीवर योग्य उपचार झाले नाही तर खोकला आणि श्वास घेण्याचा त्रास अधिक वाढतो आणि सीडीसीनुसार ३८ टक्के मृत्यू दरासोबत हा व्हायरस घातक ठरू शकतो.

कोरोना व्हायरसमुळे १६,५०० हून अधिकांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार जगभरात कोरोना व्हायरसचे ३,८४,००० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर १६,५०० हून अधिक लोकांचा यामुळे मृत्यू झालाय. तर इटलीमध्ये सर्वाधिक ६००० हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय आणि स्पेनमध्ये २३०० हून अधिक आणि इराणमध्ये १८०० हून अधिक लोकांचा मृत्यू कोरोना व्हायरसमुळे झालाय.

भारताबाबत बोलायचं झालं तर कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशातील ३२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील ५६० जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलंय. तर पंजाब आणि महाराष्ट्रात कर्फ्यू लावला गेलाय. भारतात कोरोना व्हायरसचे एकूण संक्रमित रुग्णांची संख्या ४९२ झालीय. देशात कोरोना व्हायरसमुळे १० लोकांचा आतापर्यंत मृत्यू झालाय.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...