मुंबई: सीडीएस बिपिन रावत(CDS Bipin Rawat) यांचे दुखद: निधन झाले आहे. भारतीय वायुसेनेने(indian air force) ट्विटरवरून ही बातमी शेअर केली. बुधवारी तामिळनाडूच्या(tamilnadu) कुन्नूरमध्ये सेनेचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. सीडीएस बिपिन रावत यांच्याव्यतिरिक्त या अपघातात त्यांची पत्नी मधुलिका रावत(madhulika rawat) यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार बिपिन रावत आपल्या पत्नीसह वेलिंग्टनमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. कुन्नूरच्या घनदाट जंगलात हा अपघात झाला. Know all about CDS General Bipin Rawat and Madhulika Rawat's
लेफ्टनंट जनर लक्ष्मण सिंह रावत यांचे पुत्र बिपिन रावत यांचा जन्म उत्तराखंडच्या पौडी गढवाल येथे झाला होता. त्यांच्या कुटुंबाने गेल्या अनेक पिढ्यांपासून देशाची सेवा केली आहे. बिपिन रावत, सेंट एडवर्ड स्कूल, शिमला आणि राष्ट्रीय रक्षा अकादमी, खडकसला यांचे विद्यार्थी होते. त्यांना १९७८मध्ये भारतीय सैन्य अॅकॅडमी, डेहराडून येथून ११व्या गोरखा रायफल्सच्या पाचव्या बटालियनमध्ये नियु्क्त करण्यात आले होते. येथे त्यांना स्वॉर्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले होते.
बिपिन रावत यांची पत्नीही आर्मी वेलफेअरशी संबंधित होती. त्या आर्मी वुमन वेलफेअर असोसिएशनच्या अध्यक्ष होत्या. बिपिन रावत यांच्या पश्चात दोन मुली आहेत. एका मुलीचे नाव कृतिका रावत आहे. दोन्ही मुलींना आपल्या आई-वडिलांना या अपघातात गमावले.
सीडीएस बनवण्याआधी बिपिन रावत हे २७वे सेनाध्यक्ष होते. आर्मी चीफ बनवण्याआधी त्यांना १ सप्टेंबर २००१६मध्ये भारतीय सैन्य दलाच्या उप सैन्य प्रमुख पदी नियुक्त करण्यात आले होते.
बिपिन राऊत यांच्यासह या अपघातात त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचेही निधन झाले आहे. त्या आर्मी वाईव्हज वेलफेअर असोसिएशनच्या अध्यक्ष होत्या. ही संस्था लष्करात कार्यरत असणारे कर्मचारी त्यांची पत्नी, मुले आणि आश्रितासाठी काम करते. १९६६मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली. ही संस्था युद्धात ज्या सैनिकांनी प्राण गमावले त्यांच्या पत्नी आणि आश्रितांसाठी काम करते. मधुलिका या दिल्ली विद्यापीठातून मानसशास्त्र या विषयात पदवीधर होत्या. विविध सामाजिक कार्यांमध्ये त्या भाग घेत असतं. त्या संस्थेमार्फत विविध कार्यक्रमही राबवत असतं.यंदाच्या वर्षी त्यांच्या नेतृत्वाखाली महिला दिनी म्हणजेच ८ मार्चला आर्मी जल अभियान सुरू करण्यात आले. परदेशी कंपन्यांचे बाटलीबंद पाणी घेण्यापेक्षा लष्कराचे पाणी विकत घेण्याच्या उद्देषाने हे अभियान सुरू करण्यात आले. यामुळे यातून जमा झालेला पैसा शहीद सैनिकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी होईल.
मधुलिका या माहेरच्या मधुलिका सिंह होत्या. स्व. कुंवर मृगेंद्रिं सिंह यांच्या त्या कन्या होत्या. मृगेंद्रिं सिंह हे शहडोलच्या सोहागरपूर येथून दोन वेळा काँग्रेसच्या तिकीटावर आमदार झाले होते. १९८५मध्ये त्यांचे बिपिन रावत यांच्याशी लग्न झाले.