T. Raja: भाजपच्या हिंदुत्वाचा अजेडा पसरवणारे टी.राजा आहे तरी कोण जाणून घ्या सर्व काही; नावावर आहेत 43 केसेस

 तेलंगणाचे (Telangana) भाजप आमदार (BJP MLA) टी राजा (T Raja) यांना पोलिसांनी (Police) अटक केली आहे. राजा यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी टी राजाविरुद्ध अनेक कलमांखाली एफआयआरही (FIR) नोंदवला आहे. टी. राजाने सोशल मीडियावर अपलोड केलेल्या एका व्हिडिओवरून या वादाला सुरुवात झाली.

Know everything about who is the T. Raja
जाणून घ्या अटक झालेल्या टी राजाबद्दल; का झाली कारवाई  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • भाजप आमदार टी राजा यांनी नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला आहे.
  • या व्हिडिओमध्ये त्यांनी नुपूर शर्माचे समर्थन करताना प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल कथित टिप्पणी केल्याचा आरोप.
  • कॉमेडियन मुनव्वर फारुकी याने एका शोदरम्यान धार्मिक भावना भडकावणारी टिप्पणी केली होती.

तेलंगणा :  तेलंगणाचे (Telangana) भाजप आमदार (BJP MLA) टी राजा (T Raja) यांना पोलिसांनी (Police) अटक केली आहे. राजा यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी टी राजाविरुद्ध अनेक कलमांखाली एफआयआरही (FIR) नोंदवला आहे. टी. राजाने सोशल मीडियावर अपलोड केलेल्या एका व्हिडिओवरून या वादाला सुरुवात झाली. कोण आहेत टी राजा, का झाली ही कारवाई याची माहिती आपण घेणार आहोत..

टी. राजाला अटक का झाली?

भाजप आमदार टी राजा यांनी नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी नुपूर शर्माचे समर्थन करताना प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल कथित टिप्पणी केल्याचा आरोप आहे. त्यांची पोस्ट इतकी व्हायरल झाले यानंतर तेलंगणातील विविध जिल्ह्यांमध्ये निदर्शने सुरू झाली. रात्री उशिरा लोकांनी डबीरपुरा, भवानीनगर, मिचोक, रेनबाजार येथील पोलीस ठाणे गाठून आंदोलन सुरू केले. यानंतर भाजप आमदार टी राजा यांना अटक करण्यात आली आहे. डीसीपी पी साई चैतन्य म्हणाले, काल रात्री दक्षिण झोन डीसीपी कार्यालयात मोठ्या संख्येने लोकांनी निदर्शने केली होती. भाजप आमदाराने एका समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, असे लोकांचे म्हणणे आहे. यानंतर त्याच्यावर आयपीसीच्या अनेक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Read Also : विधानसभेच्या पुढील निवडणुका कधी, राज ठाकरेंनी सांगितला महिना

पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यातही घेतले

यानंतर त्याच्याविरुद्ध डबीरपुरा पोलिस ठाण्यात आयपीसीच्या 295 (अ), 153 (अ) सह अनेक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यातही घेतले आहे. हैदराबादचे पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस महासंचालक कार्यालय आणि जुन्या पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कुठून सुरु झाला वाद

कॉमेडियन मुनव्वर फारुकी याने एका शोदरम्यान धार्मिक भावना भडकावणारी टिप्पणी केली होती. यानंतर टी राजा यांनी मुनव्वर फारुकीलाही धमकी दिल्याचा आरोप आहे. त्याचा शो रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली. तर शुक्रवारी, टी राजा हे मुनव्वर फारुकीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना प्रतिबंधात्मक ताब्यात घेतले.

Read Also : आशिया कपमध्ये विराट कोहलीला माय-लेक करणार चिअर

कोण आहे टी राजा?

टी राजा यांचा जन्म 15 एप्रिल 1977 रोजी हैदराबाद येथे झाला. 45 वर्षीय टी राजा यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात तेलुगु देसम पक्षातून केली होती. 2014 मध्ये ते भाजपच्या तिकिटावर पहिल्यांदा घोसमहलमधून आमदार म्हणून निवडून आले. 2018 मध्ये दुसऱ्यांदा जिंकले. राजा यांच्याकडे एकूण 3.31 कोटी रुपयांची संपत्ती आहे. 2018 च्या निवडणुकीत राजा 45.2 टक्के मतांच्या फरकाने विजयी झाले होते.  राजा सिंह यांनी वेगवेगळ्या प्रसंगी एका विशिष्ट समुदायाविरुद्ध अनेक वक्तव्ये केली आहेत. 2020 मध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामने त्याच्यावर बंदी घातली होती. त्याच्यावर नेहमी द्वेष पसरवल्याचा आरोप होत आहे.

43 प्रकरणांत 16 आरोपपत्र दाखल 

आमदार टी राजा हे यापूर्वीही वादात सापडले आहेत. टी राजा सिंह यांनी 2018 मध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्याच्यावर आतापर्यंत एकूण 43 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी 16 प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. राजा यांच्यावर धार्मिक उन्माद पसरवल्याप्रकरणी यापूर्वी 17 गुन्हे दाखल आहेत. नऊ प्रकरणे धार्मिक भावना दुखावण्याशी संबंधित आहेत. त्याच्यावर यापूर्वीही जाळपोळ, दंगलीसह अनेक गंभीर आरोप आहेत.

Read Also : शेतकऱ्यांसाठी जबरदस्त योजना, मिळणार 1.60 लाख रुपये!

लोकसंख्येच्या स्फोटासाठी मुस्लिमांना जबाबदार 

राजा सिंह यांनी एका व्हिडिओमध्ये लोकसंख्येच्या स्फोटासाठी मुस्लिम समुदायाला जबाबदार धरले होते. टी राजा यांच्यावर उत्तर प्रदेशच्या मतदारांना धमकावल्याचा आरोपही करण्यात आला होता. यूपी विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या बाजूने मतदान न केल्यास त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान  पैगंबर प्रकरणात पोलिसांनी टी राजाविरुद्ध आयपीसीच्या कलम २९५ (ए), १५३ (ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ओवेसी म्हणाले- भाजपला दंगल घडवायची आहे

राजा सिंह यांच्या कथित वक्तव्यावर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले- 'मी भाजप आमदाराच्या वक्तव्याचा निषेध करतो. भाजपला तेलंगणातील शांतता बिघडवायची आहे, भाजपला हैदराबादमधील शांतता बिघडवायची आहे आणि येथे जातीय दंगली घडवायची आहेत.

Read Also : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी गुरूवारी

आत्तापर्यंत काय झाले?

21 ऑगस्ट रोजी आमदार टी राजा यांचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला होता. रात्री उशिरापर्यंत शेकडो मुस्लिमांनी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांवर निदर्शने सुरू केली. हैदराबाद पोलिसांनी या प्रकरणी टी राजाविरोधात गंभीर कलमांतर्गत एफआयआर नोंदवला आहे.
22 ऑगस्टला सकाळी टी राजाला पोलिसांनी अटक केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी