Dispose National Flag Respectfully : राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक डिस्पोज करा, वाचा मार्गदर्शक सूचना

स्वातंत्र्यदिन साजरा झाल्यानंतर घरोघरी असणाऱ्या राष्ट्रध्वजांचं सन्मानपूर्वक डिस्पोजल करणं गरजेचं आहे. त्यासाठी भारत सरकारच्या काही मार्गदर्शक सूचना समजून घेणं आवश्यक आहे.

Dispose National Flag Respectfully
राष्ट्रध्वज डिस्पोज करण्याचे हे आहेत नियम  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक डिस्पोज करणे आवश्यक
  • भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचना
  • आदरपूर्वक करा डिस्पोज

Dispose National Flag Respectfully : ‘हर घर तिरंगा’ उपक्रम देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 13 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत अनेकांनी आपापल्या घरी राष्ट्रध्वज (National Flag) आणले होते. मात्र आता स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा झाल्यानंतर या ध्वजांचं काय करायचं, असा प्रश्न अनेकांसमोर उभा ठाकला आहे. दरवर्षी स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन साजरा झाल्यानंतरही रस्त्यावर राष्ट्रध्वज टाकून देण्याची चूक अनेकजण करत असतात. यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. रस्त्यावर पडणारे राष्ट्रध्वज उचलून त्यांची सन्मानपूर्वक विल्हेवाट (Respectful Dispose) लावण्याचं काम काही स्वयंसेवी संस्था करतच असतात. मात्र प्रत्येकाने याबाबत भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचना समजून घेणं गरजेचं आहे. झेंडा फाटला असेल, डागाळला असेल किंवा खराब झाला असेल तर तो कुठेही टाकून न देता त्याची आदरपूर्वक विल्हेवाट लावणं गरजेचं असतं. त्यासाठी काही सोप्या उपायांनी सन्मानपूर्वक आपला राष्ट्रध्वज डिस्पोज करता येऊ शकतो. 

असा करावा राष्ट्रध्वज डिस्पोज

राष्ट्रध्वज हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचा आणि अस्मितेचा विषय असतो. त्यामुळे राष्ट्रध्वज कुठेही फेकून देऊ नये. तो इतरांना दिसणार नाही, सार्वजनिक ठिकाणी त्याचं चुकीचं प्रदर्शन होणार नाही, याची काळजी घेणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. त्यामुळे शक्यतो एकांतात झेंड्याची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. झेंड्याचं सन्मानपूर्वक दहन करावं किंवा दफन करावं असं भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद कऱण्यात आलं आहे. 

सन्मानपूर्वक करा दहन

खराब झालेला, फाटलेला किंवा डागाळलेला ध्वज सार्वजनिक ठिकाणी टाकून देऊ नये. कचऱ्यात किंवा रस्त्यावर खराब ध्वज फेकणं हा त्याचा अवमान समजला जातो. एखाद्या व्यक्तीप्रमाणेच राष्ट्रध्वजालाही सन्मान देण्यात यावा आणि त्याचं आदरपूर्वक डिस्पोजल करण्यात यावं, असं मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद कऱण्यात आलं आहे. त्यामुळे शक्यतो खासगी जागेत आणि एकांतात झेंड्याचं दहन करावं आणि त्याची आदरपूर्वक विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. द प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर ॲक्ट, 1971 आणि फ्लॅग कोड ऑफ इंडिया 2002 मध्ये राष्ट्रध्वज कसा डिस्पोज करावा, हे स्पष्ट करण्यात आलं आहे. 

अधिक वाचा - Terrorist Attack: दहशतवाद्यांच्या टार्गेटवर परत एकदा पंडित; शोपियामध्ये दोन काश्मिरी पंडितांवर गोळीबार

सन्मानपूर्वक करा दफन

झेंड्याचं दफन कसं करावं, याबाबतही स्पष्ट मार्गदर्शक सूचना उपलब्ध आहेत. त्यानुसार खराब झालेले राष्ट्रध्वज एकत्र करावेत. त्यांची घडी घालावी. एका लाकडी पेटीत सन्मानपूर्वक ते राष्ट्रध्वज रचून ठेवावेत. पेटी व्यवस्थित बंद करावी आणि ती जमिनीत दफन करण्यात यावी. त्यासाठी जमिनीत पुरेसा खोल खड्डा खणण्यात यावा जेणेकरून प्राणी ती पेटी उकरून बाहेर काढू शकणार नाहीत. 

अधिक वाचा - Nitish Kumar Cabinet list: नितीश मंत्रिमंडळात 31 चेहरे, पाहा मंत्रिमंडळाची संपूर्ण यादी, कोणाला मिळालं कोणते मंत्रिपद

ध्वजाचा करा सन्मान

बाजारातून झेंडा विकत आणण्याचा उत्साह अनेकांना असतो. मात्र झेंडावंदन झाल्यानंतर राष्ट्रध्वजाचं काय करायचं, याची कल्पना नसते. त्यामुळे अज्ञानापोटी अनेकजण राष्ट्रध्वज टाकून देताना किंवा सार्वजनिक ठिकाणी फेकताना दिसतात. यंदा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असल्याने मोठ्या प्रमाणात झेंडे नागरिकांकडे आहेत. ते सन्मानपूर्वक डिस्पोज करण्याची जबाबदारी ध्वज बाळगणाऱ्या प्रत्येकाची आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी