Today History: आजच्याच दिवशी जन्मलेली सुनिता विल्यम्स

know the history of september 19 what happened today in history आज १९ सप्टेंबर २०२०, शनिवार. आजच्याच दिवशी भारतीय वंशाची अंतराळवीर सुनिता विल्यम्स हिचा जन्म झाला.

Sunita Williams
सुनिता विल्यम्स 

थोडं पण कामाचं

 • Today History: आजच्याच दिवशी जन्मलेली सुनिता विल्यम्स
 • भारताच्या तसेच जगाच्या इतिहासात वेगवेगळ्या कारणांमुळे १९ सप्टेंबर या दिवसाला प्रचंड महत्त्व
 • जाणून घेऊ १९ सप्टेंबरचे ऐतिहासिक महत्त्व

नवी दिल्ली: आज १९ सप्टेंबर २०२०, शनिवार. आजच्याच दिवशी भारतीय वंशाची अंतराळवीर (astronaut) सुनिता विल्यम्स (Sunita Williams) हिचा जन्म झाला. भारत आज अंतराळ क्षेत्रात कमालीचा यशस्वी देश आहे. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त अंतराळ योजना यशस्वी करण्यासाठी भारत ओळखला जातो. स्वदेशी तंत्रज्ञानाच्या जोरावर भारताने ही मजल मारली. आत्मनिर्भर भारत इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमांमुळे प्रत्यक्षात आला. याच भारताला सुनिता विल्यम्सच्या (Sunita Lyn Williams) रुपाने अमेरिकेत आणखी आदराच्या भावनेने बघितले जाते. अमेरिकेत नौदल अधिकारी (United States Navy officer) असलेल्या सुनिता विल्यम्सने नासाच्या अंतराळ यानातून अंतराळ प्रवास केला होता.

अमेरिकेतील (United States of America - USA) ओहयो (Ohio) प्रांतातील युक्लिड (Euclid) शहामध्ये सुनिता विल्यम्स हिचा जन्म १९ सप्टेंबर १९६५ रोजी झाला. तिने नासाच्या अंतराळ यानातून अंतराळ प्रवास केला. सलग १९५ दिवस अंतराळात राहण्याची कामगिरी सुनिताच्या नावावर आहे. एक महिला अंतराळ प्रवासी म्हणून सुनिता विल्यम्सने १९५ दिवस अंतराळात मुक्काम केला तसेच तब्बल सात वेळा अंतराळात चालून (Space Walk) विशिष्ट कामगिरी पार पाडली होती. सुनिताने अंतराळात ५० तास ४० मिनिटे चालून नवा विक्रम नोंदवला होता. 

भारताच्या तसेच जगाच्या इतिहासात वेगवेगळ्या कारणांमुळे १९ सप्टेंबर या दिवसाला प्रचंड महत्त्व आहे. जाणून घेऊ १९ सप्टेंबरचे ऐतिहासिक महत्त्व.

 1. १५८१ : शिख गुरू रामदासजी यांचे निधन
 2. १८९१ : प्रसिद्ध इंग्रजी नाटककार विल्यम शेक्सपीअर यांचे जगप्रसिद्ध नाटक मर्चंट ऑफ व्हेनिस पहिल्यांदा मँचेस्टर येथील नाट्यगृहात सादर झाले.
 3. १९५५ : अर्जेंटिनाच्या लष्कर आणि नौदलाच्या उठावानंतर राष्ट्रपती जुआन पेरोन यांना हटवण्यात आले
 4. १९५७ : अमेरिकेतील नेवाडाच्या वाळवंटात पहिल्यांदा अणुचाचणी करण्यात आली. अमेरिकेत झालेली ही पहिली अणुचाचणी होती.
 5. १९६५ : अमेरिकेतील नासा या अंतराळ संशोधन संस्थेच्या यानातून प्रवास करणारी भारतीय वंशाची अंतराळवीर सुनिता विल्यम्स हिचा जन्म झाला.
 6. १९८३ : इंग्रजांनी कॅरेबियन बेटांना तसेच सेंट किट्स आणि नेविसला स्वातंत्र्य दिले.
 7. १९८८ : इस्रायलने हॉरिझन आय या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. अंतराळ क्षेत्रात कार्यरत असलेल्या इस्रायलसाठी हे पहिले मोठे यश होते.
 8. १९९६ : एलिझा इजेत्बोगोविक युद्धानंतर झालेले बोस्नियाचे पहिले राष्ट्रपती.
 9. १९९६ : ग्वाटेमालातील बंडखोर आणि डाव्या विचारांचे स्थानिक सरकार यांच्यात लेखी शांतता करार, तणाव निवळण्यास सुरुवात.
 10. २००० : सिडनीतील ऑलिंपिक (Olympics) स्पर्धेत जास्तीत जास्त वजन उचलून कर्णम मल्लेश्वरीने (karnam malleswari) भारतासाठी कांस्य (bronze medal) पदक जिंकले.
 11. २००६ : थायलंडच्या लष्कराचा उठाव, सरकारविरोधात बंड करुन लष्कराने सरकार पाडले. जनरल सुरायुद झाले थायलंडचे पंतप्रधान.
 12. २००८ : नक्षलवाद्यांना रोखण्यासाठी सुरू असलेली सलवा जुडूम मोहीम ताबडतोब स्थगित करा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
 13. २०१४ - अॅपल आयफोन ६ ची विक्री सुरू

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी