Draupadi Murmu : भारताच्या १५व्या राष्ट्रपतींबाबत ही इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?

Draupadi Murmu : जाणून घ्या कोण आहेत द्रौपदी मुर्मू आणि कशी घडली त्यांची राजकीय कारकिर्द....

Draupadi Murmu
Draupadi Murmu : भारताच्या १५व्या राष्ट्रपतींबाबत ही इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • भारताच्या १५व्या राष्ट्रपतींबाबत ही इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?
 • जाणून घ्या कोण आहेत द्रौपदी मुर्मू?
 • अशी घडली द्रौपदी मुर्मू यांची राजकीय कारकिर्द

Draupadi Murmu : जाणून घ्या कोण आहेत द्रौपदी मुर्मू आणि कशी घडली त्यांची राजकीय कारकिर्द....

सतरा मुद्यांमध्ये थोडक्यात जाणून घ्या द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी...

 1. नाव : द्रौपदी मुर्मू 
 2. जन्म २० जून १९५८, मयूरभंज जिल्हा, ओडिशा राज्य.
 3. वडिलांचे नाव बिरांची नारायण तुडू.
 4. संथाल आदिवासी जमातीच्या सदस्या.
 5. वडील आणि आजोबा दोघेही पंचायती राज प्रणाली अंतर्गत गावप्रमुख.
 6. भुवनेश्वरच्या रमादेवी महिला विद्यापीठातून द्रौपदी मुर्मू यांनी कला शाखेतील पदवी १९७९ मध्ये घेतली.
 7. पती श्याम चरण मुर्मू. जोडप्याला दोन मुलगे आणि एक मुलगी.
 8. काही वर्षांपूर्वी पती आणि दोन्ही मुलगे यांचे निधन.
 9. द्रौपदी मुर्म यांनी ओडिशा सरकारसाठी लिपिक म्हणून काम केले. पुढे पाटबंधारे आणि ऊर्जा विभागात कनिष्ठ सहाय्यक झाल्या. काही काळ शिक्षिका होत्या. श्री अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर, रायरंगपूर येथे मानद शिक्षिका म्हणून काम केले.
 10. भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाच्या सदस्या.
 11. मुर्मू १९९७ मध्ये रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा म्हणून काम केले.
 12. ओडिशातील भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल युती सरकारच्या काळात, त्या ६ मार्च २००० ते ६ ऑगस्ट २००२ पर्यंत वाणिज्य आणि परिवहन राज्यमंत्री तर ६ ऑगस्ट २००२ ते १६ मे २००४ पर्यंत मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री.
 13. २०००-२००४ आणि २००४-२००९ मध्ये रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार.
 14. २००७ मध्ये ओडिशा विधानसभेने 'सर्वोत्कृष्ट आमदार' म्हणून नीलकंठ पुरस्काराने सन्मानित केले.
 15. २०२२ च्या भारताच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या अधिकृत उमेदवार.
 16. झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून २०१५ ते २०२१ या कालावधीत  काम पाहिले.
 17. ओडिशा राज्यातील असून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या झारखंडच्या पहिल्या राज्यपाल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी