CJI रमणांचा ठरला उत्तराधिकारी!, जाणून घ्या कोण आहे उदय लळीत जे बनू शकतात सरन्यायाधीश

Next CJI Uday Lalit:न्यायमूर्ती लळीत हे अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांशी संबंधित आहेत. यामध्ये काळवीट शिकार प्रकरणात अभिनेता सलमान खान, भ्रष्टाचार प्रकरणात पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्हीके सिंग यांच्या जन्मतारखेशी संबंधित प्रकरणाचा समावेश आहे. ते अमित शहा यांचे वकीलही राहिले आहेत.

Know who is Justice UU Lalit, can become the 49th Chief Justice of India
CJI रमणांचा ठरला उत्तराधिकारी!, जाणून घ्या कोण आहे उदय लळीत जे बनू शकतात सरन्यायाधीश  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांनी ठरवला आपला उत्तराधिकारी
  • न्यायमूर्ती लळीत हे ४९वे सरन्यायाधीश होणार आहेत.
  • न्यायमूर्ती लळीत मूळचे कोकणातील आहेत

Justice Uday Lalit: भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांनी भारताचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या नावाची शिफारस केली आहे. रामण्णा हे भारताचे ४८ वे आणि सध्याचे सरन्यायाधीश आहेत. न्यायमूर्ती लळीत हे ४९वे सरन्यायाधीश होणार आहेत. सरन्यायाधीश रमण हे याच महिन्यात निवृत्त होत आहेत.

अधिक वाचा : CAT: न्यायमूर्ती रणजित मोरे केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी


कोण आहेत न्यायमूर्ती U U ललित

न्यायमूर्ती यू यू ललित यांचे पूर्ण नाव उदय उमेश लळीत आहे. ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. न्यायाधीश म्हणून पदोन्नतीपूर्वी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून प्रॅक्टिस केली. न्यायमूर्ती लळीत हे आतापर्यंत थेट सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेले सहावे ज्येष्ठ वकील आहेत.

न्यायमूर्ती जीएस सिंघवी आणि न्यायमूर्ती एके गांगुली यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 2जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी न्यायमूर्ती लळीत यांची केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) चे विशेष वकील म्हणून नियुक्ती केली.

अधिक वाचा : धो-धो पावसात घसरले ट्रेनचे इंजिन, ड्रायव्हरच्या प्रसंगावधनामुळे वाचला अनेकांचा जीव


हे नाव अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांशी संबंधित 

लळीत यांचे अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांशी संबंध आहेत. त्यात काळवीट शिकार प्रकरणातील अभिनेता सलमान खानचाही समावेश आहे. त्यांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि त्यांच्या जन्मतारखेशी संबंधित खटल्यात माजी लष्करप्रमुख जनरल व्ही के सिंग यांचेही प्रतिनिधित्व केले आहे.

न्यायमूर्ती यूयू लळीत आणि आदर्श के गोयल यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानेच न्यायालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरील कारवाईचे रेकॉर्डिंग करण्याची परवानगी दिली. 2017 मध्ये तिहेरी तलाक प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या आणि त्याला घटनाबाह्य घोषित करणाऱ्या न्यायमूर्तींच्या खंडपीठाचाही तो भाग होता.

अधिक वाचा : नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये पॉलिटिकल स्ट्राईक

करिअर कसे आहे

न्यायमूर्ती लळीत मूळचे महाराष्ट्राचे आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील गिर्ये हे त्यांचे मूळ गाव. नंतर त्यांचे कुटुंब रायगड जिल्ह्यातील आपटा इथे स्थायिक झाले आहे.  न्यायमूर्ती उदय लळीत यांचा जन्म मुंबईतील आंग्रेवाडी इथे झाला. त्यांनी शिरोडकर हायस्कूलमधून मराठी माध्यमातून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. पुढे वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रथम मुंबईतील ज्येष्ठ वकील एम. ए. राणे यांच्याकडे काही वर्षे सहायक म्हणून काम केले. नंतर ते दिल्लीत गेले आणि सहा वर्षे त्यांनी ज्येष्ठ विधिज्ञ सोली सोराबजी यांचे सहकारी म्हणून काम केले.

जून 1983 मध्ये ते बारमध्ये रुजू झाले आणि 1986 पासून ते सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत. त्यांनी 1986 ते 1992 पर्यंत माजी ऍटर्नी-जनरल म्हणून काम केले, सोली जे. सोराबजींसोबत काम केले. एप्रिल 2004 मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील म्हणून नामांकित केले. ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीचे दोन टर्मसाठी सदस्य झाले आणि 13 ऑगस्ट 2014 रोजी त्यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी