Sindhutai Sapkal death : ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांचे निधन, पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली

Sindhutai Sapkal death  : अनाथांची माय आणि ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांचे मंगळवारी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधूताई यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

Multibagger Stock
थोडं पण कामाचं
  • सिंधूताई सपकाळ यांचे मंगळवारी हृदय विकाराच्या झटक्याने निधन
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधूताई यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
  • भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानही केला होता. 

Sindhutai Sapkal death  : नवी दिल्ली : अनाथांची माय आणि ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ (sindhutai sapkal) यांचे मंगळवारी हृदय विकाराच्या झटक्याने (heart attack) निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सिंधूताई यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या जाण्याने आपल्याला दुःख झाल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. 


ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात गॅलक्सी रुग्णालयात हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ७३ वर्षांच्या होत्या. गेल्या दीड महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांनी अनाथ बालकांना दत्तक घेऊन त्यांचे पालकत्व स्विकारले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानही केला होता. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधूताई सपकाळ यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करून म्हटले आहे की, 

डॉ.सिंधुताई सपकाळ यांनी केलेल्या समाजसेवेसाठी त्या कायम स्मरणात राहतील. त्यांनी केलेल्या कार्यामुळे अनेक अनाथ बालकांना चांगले आयुष्य लाभले. माई यांच्या निधनाने आपल्याला दुःख झाले असून त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत असे म्हणून त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. 

सिंधूताई सपकाळ यांच्यावर दीड महिन्यापूर्वी हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास हृदय विकाराच्या झटाक्याने त्यांचा मृत्यू झाला. 

माईंनी मुलांना सांभाळण्यासाठी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून सिंधूताई सकपाळ अनाथांच्या माई झाल्या. सिंधूताई सपकाळ यांनी बाल निकेतन हडपसर, सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, अभिमान बाल भवन, गोपिका गाईरक्षण केंद्र, ममता बाल सदन आणि सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्था अशा संस्था स्थापन केल्या.  अनाथ बालकांना सर्व शिक्षण देणे, त्यांच्या जेवणाची, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धत करून देणे, शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीमार्गदर्शन, आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देण्याचे त्यांच्या विवाहाचे आयोजन अशी अनेक कार्य त्यांच्या संस्थेमार्फत करण्यात आली आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी