Kulbhushan Jadhav gets right to appeal कुलभूषण जाधव यांना फाशी विरोधात दाद मागता येणार

Kulbhushan Jadhav gets right to appeal, Pakistan parliament adopts bill पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना फाशीच्या शिक्षेविरोधात न्यायालयात दाद मागता येणार आहे.

Kulbhushan Jadhav gets right to appeal, Pakistan parliament adopts bill
कुलभूषण जाधव यांना फाशी विरोधात दाद मागता येणार 
थोडं पण कामाचं
  • कुलभूषण जाधव यांना फाशी विरोधात दाद मागता येणार
  • पाकिस्तानच्या संसदेने संयुक्त सभा घेऊन मंजूर केले विधेयक
  • कुलभूषण यांना पाकिस्तानच्या वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची संधी

Kulbhushan Jadhav gets right to appeal, Pakistan parliament adopts bill । इस्लामाबाद: सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना फाशीच्या शिक्षेविरोधात न्यायालयात दाद मागता येणार आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेश आल्यानंतर पाकिस्तानच्या संसदेने संयुक्त सभा घेऊन एक विधेयक मंजूर केले. यामुळे कुलभूषण जाधव यांना फाशीच्या शिक्षेविरोधात न्यायालयात दाद मागण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

भारतीय नौदलातील नोकरीनंतर कुलभूषण जाधव व्यवसायाच्या निमित्ताने इराणमध्ये गेले. इराणच्या पाकिस्तान सीमेजवळच्या एका बंदरामध्ये ते कामाच्या निमित्ताने गेले होते. यानंतर पुढील काही दिवस कोणाशीही त्यांचा संपर्क नव्हता. इराणमधील कुलभूषण जाधव यांच्या मित्रांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली. पोलीस तपास सुरू असताना पाकिस्तानने कुलभूषण यांना अटक केल्याचे जाहीर केले. 

कुलभूषण यांनी देशविरोधी कारवाया केल्या म्हणून त्यांना अटक केल्याचे पाकिस्तानने सांगितले. पण हा दावा भारत सरकारने फेटाळला. भारतीय नागरिकाचे इराणमधून अपहरण करुन त्याला खोट्या आरोपात अडकवण्यात आले आहे, असे भारत सरकारने सांगितले. मात्र पाकिस्तानने देशविरोधी कारवायांचा आरोप ठेवून कुलभूषण जाधव यांच्या विरोधात लष्करी न्यायालयात खटला चालवला. सुनावणीअंती दोषी ठरवून कुलभूषण यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. 

देशविरोधी कारवायांसाठी लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरोधात पाकिस्तानच्या न्यायालयात परदेशी नागरिकाला दाद मागण्याची तरतूद नाही. यामुळे कुलभूषण यांना दाद मागता येत नव्हती. अखेर भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागून कुलभूषण यांना पाकिस्तानच्या वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची संधी मिळवून दिली. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही महिन्यांनी अखेर पाकिस्तानच्या संसदेने एक विधेयक मंजूर करुन कुलभूषण यांना पाकिस्तानच्या वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची संधी दिली आहे. या संधीचा वापर करण्याबाबतचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य कुलभूषण जाधव यांना मिळाले आहे. याआधीच आंतरराष्ट्रीय न्यायालयाने एका सुनावणी दरम्यान कुलभूषण यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी