कुमार विश्वास यांनी देशाला दिला धोक्याचा इशारा

Kumar Vishwas warned the country of danger : आम आदमी पार्टीतून बाहेर पडलेले कवी कुमार विश्वास यांनी देशाला धोक्याचा इशारा दिला आहे.

Kumar Vishwas warned the country of danger
कुमार विश्वास यांनी देशाला दिला धोक्याचा इशारा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • कुमार विश्वास यांनी देशाला दिला धोक्याचा इशारा
  • कुमार विश्वास यांनी थेटपणे कोणाचेही नाव घेतलेले नाही
  • इशारा आम आदमी पार्टी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भातला असल्याची चर्चा

Kumar Vishwas warned the country of danger : नवी दिल्ली : आम आदमी पार्टीतून बाहेर पडलेले कवी कुमार विश्वास यांनी देशाला धोक्याचा इशारा दिला आहे. कुमार विश्वास यांनी थेटपणे कोणाचेही नाव घेतलेले नाही पण त्यांनी दिलेला इशारा हा आम आदमी पार्टी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भातला असल्याची चर्चा आहे.

पंजाब, हरयाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांचा विशिष्ट भाग एकत्र करून स्वतंत्र खलिस्तानची स्थापना करणे ही भारतविरोधी असलेल्या खलिस्तानवाद्यांची मूळ योजना आहे. ही योजना राबविण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मध्यंतरीच्या काळात हे प्रयत्न थंडावल्याचे चित्र होते. पण मागील काही महिन्यांपासून हे प्रयत्न नव्याने सुरू झाले आहेत. 

खलिस्तानवाद्यांनी भारत सरकार विरोधात शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. विशेष म्हणजे याच आंदोलनाला आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांचा जाहीर पाठिंबा होता. वाढते कोरोना संकट आणि देशापुढील इतर आव्हानांचा विचार करून भारत सरकारने कृषी कायदे मागे घेतल्याचे जाहीर केले. यानंतरही पंजाबमधील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही. यामुळे पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी नव्याने आंदोलन केले. हे आंदोलन आम आदमी पार्टी सरकारने पोलीस बळाचा वापर करून चिरडले. विशेष म्हणजे भारत सरकार विरोधात आंदोलन करताना आघाडीवर असलेले अनेक नेते आणि त्यांच्या संघटना पंजाबमधील आंदोलनातून गायब होत्या. याच सुमारास पंजाबमध्ये खलिस्तान चळवळ पुन्हा सक्रीय होण्यास सुरुवात झाल्याचे वृत्त आहे.

हिमाचल प्रदेश मधील धरमशाला (धर्मशाला / धर्मशाळा) येथे रविवार ८ मे २०२२ रोजी विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर खलिस्तानचे झेंडे लावलेले दिसले. तापिवन येथे असलेल्या विधानसभेच्या संरक्षक भिंतीवर तसेच मुख्य प्रवेशद्वारावार झेंडे लावलेले दिसले. भिंतीवर आणि काही झेंड्यांवर 'खलिस्तान झिंदाबाद' अशी घोषणा लिहिलेली होती. सुरक्षा पथकाने झेंडे काढून घेतले आणि भिंतीवरील घोषणा पुसून टाकल्या. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. 

पोलिसांचा तपास सुरू असतानाच कुमार विश्वास यांनी देशाला धोक्याचा इशारा देणारे ट्वीट केले आहे. 'देश मेरी चेतावनी को याद रखे... पंजाब के वक़्त कहा था, उसकी अब इस दूसरे प्रदेश पर नज़र है। मैंने पहले भी चेताया था, फिर कह रहा हूँ....' अशा शब्दात कुमार विश्वास यांनी देशाला धोक्याचा इशारा दिला आहे.

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे असतानाच्या काळातच कुमार विश्वास यांनी आम आदमी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पक्षातून बाहेर पडल्यापासून कुमार विश्वास केजरीवाल आणि त्यांचा पक्ष देशासाठी धोकादायक असल्याचे सांगत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी