Paigambar Comment Issue : कुवैतच्या सुपरमार्केटमधून भारतीय उत्पादनं हटवली, भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मांच्या वक्तव्याचे पडसाद

भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या विधानानंतर कुवैतमधील एका सुपर मार्केटमधून भारतीय उत्पादनांची विक्री बंद करण्यात आली आहे.

Paigambar Comment Issue
नुपूर शर्मांच्या वक्तव्याचे कुवैतमध्ये पडसाद  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • नुपूर शर्मांच्या विधानाचा कुवैतकडून निषेध
  • सुपर मार्केटमधील भारतीय उत्पादने हटवली
  • मुस्लीम देशांत वक्तव्याचे पडसाद

Paigambar Comment Issue : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) प्रवक्त्या (Spokesperson) नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी मोहम्मद पैगंबर (Mohammad Paigambar) यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद मुस्लीम राष्ट्रांमध्ये उमटण्याचा सिलसिला सुरूच आहे. कुवैतमधील एका सुपरमार्केटनं भारतीय उत्पादनं हटवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय राजदूतांकडे या घटनेचा निषेध नोंदवणऱ्या देशांमध्ये आता कुवैतचीही भर पडली आहे. नुपूर शर्मा यांचं वक्तव्य हे इस्लामविरोधी असल्यााचं सांगत या सुपरमार्केटनं भारतीय उत्पादनं हटवली आहेत. अल अरदिया को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या स्टोर्समधून भारतीय चहा आणि इतर उत्पादने रॅकमधून काढून टाकण्यात आली आहेत. 

मुस्लीम देशांकडून टीकास्त्र

सौदी अरेबिया, कतार आणि इतर आखाती देशांनी भाजप प्रवक्त्यांकडून करण्यात आलेल्या या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे. भाजपकडून नुपूर शर्मा यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. कुवैतमधील सुपरमार्केटमध्ये ठेवण्यात आलेल्या तांदुळाच्या पिशव्या, मसाले आणि मिरची उत्पादनं यांच्यावर कापड टाकून या वस्तू विकल्या जाणार नसल्याचा बोर्ड लावण्यात आला आहे. अरबी भाषेत हा बोर्ड लिहिला असून “आम्ही भारतीय उत्पादनं विकणार नाही”, असं या संदेशात लिहिण्यात आलं आहे. 

या स्टोर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) नसीर अल मुताईरी यांनी AFP या वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकल्याचं म्हटलं आहे. “कुवैती मुस्लीम या नात्याने आम्ही मोहम्मद पैगंबरांचा अपमान सहन करू शकत नाही. सध्या एका स्टोअरमधील भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. लवकरच कंपनी स्तरावर हा बहिष्कार टाकण्याचा आम्ही विचार करत आहोत.”

देशात अस्वस्थता

भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एक वाहिनीवर केलेल्या या विधानाचे पडसाद देशातही उमटत आहेत. या वक्तव्यामुळेच उत्तर प्रदेशमध्येदेखील तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. नुपूर शर्मांना अटक करावी, अशी मागणी काही आंदोलकांनी केली होती. 

भारत सरकारचं स्पष्टीकरण

नुपूर शर्मा यांच्या विधानाशी आपला संबंध नसल्याची भूमिका केंद्र सरकार आणि भाजपने घेतली आहे. काही ‘फ्रिंज इलेमेंट्स’ अशा प्रकारची विधानं करत असून भारत सरकार या विधानांचं समर्थन करत नाही, अशी भूमिका सरकारनं आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली आहे. सरकार सर्व धर्मियांप्रति एकसारखा सन्मान बाळगत असून सर्व धर्मांचा आणि श्रद्धांचा आदर करत असल्याची प्रतिक्रिया सरकारतर्फे देण्यात आली आहे. पक्षाच्या वतीन नुपूर शर्मा यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची बाबही केंद्र सरकारने अधोरेखित केली असून अनेक मुस्लीम राष्ट्रांनी या कारवाईचं स्वागत केलं आहे. 

अधिक वाचा - UPSC CDS Topper : मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण युपीएससीत टॉपर, ड्रायव्हर आणि दुकानदाराच्या मुलांनी ‘करून दाखवलं’

भाजपच्या दोन प्रवक्त्यांनी लागोपाठ केलेल्या वक्तव्यांमुळे अनेक मुस्लीम राष्ट्रे आक्रमक झाल्याचे चित्र आहे. या वक्तव्याचा जगभरातून निषेध सुरू असून भारत सरकार परिस्थिती निवळण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत असल्याचं चित्र आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी