लखीमपूर खेरी कांड : शेतकऱ्यांना कारने चिरडणारा भाजप नेता सुमित जायस्वाललासह ४ जणांना अटक

उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना कारने उडविण्याच्या घटनेत सहभागी असलेल्या इतर चार आरोपींना युपी पोलिसांनी अटक केली आहे.

 BJP leader Sumit Jaiswal arrested for crushing farmers
शेतकऱ्यांना कारने चिरडणारा भाजप नेता सुमित जायस्वाललासह ४ जणांना अटक   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सुमित जायस्वाल भाजपचा स्थानिक नेता आहे.
  • शेतकऱ्यांना कारने चिरडण्याच्या एका व्हिडिओमध्ये सुमित घटनास्थळावरुन पळाताना दिसला होता.
  • केंद्रीय मंत्री अजय मिश्राचा मुलगा आशीष मिश्रा यालाही अटक करण्यात आली आहे.

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना कारने उडविण्याच्या घटनेत सहभागी असलेल्या इतर चार आरोपींना युपी पोलिसांनी अटक केली आहे. यात एक भाजप नेता सुमित जायस्वालचाही सहभाग आहे. सुमित घटनेच्या वेळी एसयुव्ही (SUV) कारमध्ये बसलेले होता. सुमित जायस्वाल भाजपचा स्थानिक नेता आहे. शेतकऱ्यांना कारने चिरडण्याच्या एका व्हिडिओमध्ये सुमित घटनास्थळावरुन पळाताना दिसला होता. 

याप्रकरणी उलट सुमित जायस्वालनेच शेतकऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करुन ठेवली आहे. या तक्रारीमध्ये त्याने चालक, मित्र आणि दोन भाजप कार्यकर्त्यांना मारहाण करुन त्यांचा खून केल्याचा आरोप केला आहे.     दरम्यान या शेतकऱ्यांना कारखाली चिरडण्याच्या गुन्ह्यामध्ये केंद्रीय मंत्री अजय मिश्राचा मुलगा आशीष मिश्रा यालाही अटक करण्यात आली आहे. लखीमपूर खेरीत झालेल्य हिंसाचारात चार शेतकरी आणि एका पत्रकाराचा जीव गेला आहे. तर इतर तीन लोकांचा मृत्यू मारहाणी झाला असून याचा आरोप आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर आहे. दरम्यान या प्रकरणात सुमित जायस्वालसह शिशुपाल,नंदन सिंह बिष्ट, आणि सत्य प्रकाश त्रिपाठी यांना लखीमपूर पोलीस आणि गुन्हे अन्वेषण विभागातील पोलिसांनी आज अटक केली आहे. 

वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रशांत कुमार यांनी सांगितले की, सत्य प्रकाश त्रिपाठी यांच्याकडून परवानाधारक रिव्हॉल्व्हर आणि तीन काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी यूपी पोलिसांनी गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्राला आधीच अटक करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना चिरडण्याच्या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

यापैकी एका व्हिडिओमध्ये सुमित जयस्वाल एसयूव्हीच्या बाहेर पळताना दिसत आहे.  त्यानंतर जबाबाच्या आधारे त्याची ओळख पटली. सुमितने युक्तिवाद केला की, शेतकऱ्यांनी जोरदार दगडफेक केल्यावर कारवरील ताबा सुटला आणि  शेतकऱ्यांच्या अंगावर कार गेली. शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या एसयुव्हीसह तीन कारचा ताफा होता. यातील एक कार गृह राज्य मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाची होती.  पोलिसांनी या प्रकरणात आशिष मिश्राला खुनी बनवले आहे, ज्याला 12 तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर 9 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली.  

पीडित शेतकर्‍यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, मंत्र्याचा मुलगाही कारमध्ये होता तो सर्वात पुढे बसला होता. या प्रकरणी यूपी पोलिसांच्या ढिसाळ वृत्तीबद्दल सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना फटकारले होते. तीन ऑक्टोबर रोजी या घटनेसंदर्भात तिकोनिया पोलीस ठाण्यात पीडित शेतकऱ्यांच्या वतीने एफआयआर दाखल करण्यात आली होती. तर सुमित जयस्वाल आणि इतरांनी काउंटर एफआयआर दाखल केली होती. सुमितने आधी दावा केला होता, "आम्ही कार्यक्रमस्थळी होतो आणि सर्वत्र भीतीचे वातावरण होते. आंदोलक काठ्या आणि दगडांनी सशस्त्र होते आणि आमच्यावर सतत हल्ला करत होते आणि शिवीगाळ करत होते.  ते खलिस्तान जिंदाबादच्या घोषणाही देत ​​होते. ते गाडीवरही चढले."  मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्राने दावा केला की, तो घटनास्थळी नव्हता. घटनेच्या वेळी तो दोन किलोमीटर दूर त्याच्या मूळ गावी होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी