Shocking! बहिणीने पकडले हात अन् तिच्या प्रियकरानेच मित्रांसोबत मिळून केला सामूहिक बलात्कार

Crime News: शेतात एका मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे या घटनेत पीडित मुलीच्या बहिणीनेच आरोपींना मदत केली होती.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो 
थोडं पण कामाचं
  • मोठ्या बहिणीला आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह स्थितीत पीडित मुलीने पाहिलं होतं
  • मोठ्या बहिणीच्या प्रियकराने आपल्या मित्रांसोबत मिळून या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला
  • या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एकूण सात जणांना अटक केली

लखनऊ : उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १३ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्काराची (Gang rape on minor girl) घटना समोर आली आहे. ऊसाच्या शेतात आरोपींनी हे कृत्य केलं आहे. धक्कादायक म्हणजे या सर्व प्रकरणात पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीने सुद्धा आरोपींना मदत केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींनी सामूहिक बलात्कार केल्यावर तिची हत्या केल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे.

नेमकं काय घडलं? 

मोठ्या बहिणीला आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह स्थितीत पीडित मुलीने पाहिलं होतं. आपली बहिण आता घडलेला सर्व प्रकार घरी सांगेन या भीतीने मोठ्या बहिणीने तिच्या प्रियकराच्या हाती स्वाधीन केलं. यानंतर मोठ्या बहिणीच्या प्रियकराने आपल्या मित्रांसोबत मिळून या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिची निर्घृणपणे हत्या केली.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एकूण सात जणांना अटक केली आहे. पीडित महिलेची मोठी बहिण आणि चौघा आरोपींसोबतच तेथे पहारेकरी म्हणून उभ्या राहिलेल्या दोन पुरुषांचा आरोपींमध्ये समावेश आहे अशी माहिती लखीमपूर खेरीच्या पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. 

पोलिसांनी पुढे सांगितले की, पीडित मुलीच्या कुटुंबीयांची विचारपूस करताना त्यांना तिच्या मोठ्या बहिणीवर संशय आला. पीडित मुलीची बहीण प्रचंड घाबरलेली होती. ज्यावेळी पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले त्याावळी तिने आपला गुन्हा कबूल केला. आपण या गुन्ह्यात सहभागी होतो असं तिने पोलिसांच्या चौकशीत मान्य केलं आहे.

लखीमपूर खेरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजीव सुमन यांनी सांगितले की, आपल्या मोठ्या बहिणीचे चार पुरुषांसोबत अवैध संबंध समजल्यानंतर दोन्ही बहिणींमध्ये वारंवार वाद होत होता. मंगळवारी मोठी बहीण काही बहाण्याने आपल्या लहान बहिणीला उसाच्या शेतात घेऊन गेली. त्या ठिकाणी रणजीत चौहान, अमरसिंग, अंकित आणि संदिप चौहान या चार जणांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

हे पण वाचा : जांभूळ खाताना करू नका 'या' 5 चुका, नाहीतर होतील वाईट परिणाम

पोलीस अधीक्षक संजीव सुमन यांनी सांगितले की, चौघांनी मिळून पीडित मुलीवर सामूहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी या मुलीने आरोपींना विरोध केला तेव्हा तिच्या मोठ्या बहिणीने तिचे हात पकडले तर आरोपींपैकी एकाने तिला मदत केली. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. इतकेच नाही तर या घटनेनंतर पीडित मुलीच्या बहिणीने आपल्या ओढणीच्या सहाय्याने तिचा गळा आवळून हत्या केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी