लखीमपूर खेरी हिंसाचार : तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर मुख्य आरोपी आशिष मिश्राला अटक; एसआयटीने विचारली तीन डझनहुन अधिक प्रश्न

लखीमपूर खेरी हिंसाचार (Lakhimpur Kheri violence) प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा (Union Minister Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) यांना अटक करण्यात आली आहे.

 After 12 hours of interrogation Ashish Mishra arrested
मुख्य आरोपी आशिष मिश्राला अटक  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • आशिष घटनेच्या दिवशीचा 2:30 ते दुपारी 3:30 पर्यंतचा तपशील देऊ शकले नाहीत.
  • एसआयटीने आशिष मिश्रा यांना तीन डझनहून अधिक प्रश्न विचारले.
  • आशिष मिश्रा तपासात सहकार्य करत नाहीत, प्रश्नांची योग्य उत्तरे देत नाहीत, आम्ही त्यांना अधिकृतरीत्या अटक केली- डीआयजी उपेंद्र अग्रवाल

लखनऊ : लखीमपूर खेरी हिंसाचार (Lakhimpur Kheri violence) प्रकरणातील मुख्य आरोपी आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा (Union Minister Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) यांना अटक करण्यात आली आहे. आशिष मिश्रा यांची एसआयटी टीमने सुमारे 12 तास चौकशी केली. सखोल प्रश्नोत्तरानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. अटकेनंतर पोलिसांनी सांगितले की, आशिष मिश्रा तपासात सहकार्य करत नाहीत. त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. आशिष घटनेच्या दिवशीचा 2:30 ते दुपारी 3:30 पर्यंतचा तपशील देऊ शकले नाहीत.

डीआयजी उपेंद्र अग्रवाल म्हणाले की, आशिष मिश्रा तपासात सहकार्य करत नाहीत, प्रश्नांची योग्य उत्तरे देत नाहीत, आम्ही त्यांना अधिकृतरीत्या अटक केली आहे. आता मेडिकल करून त्यांना न्यायालयात हजर केले जाईल. आशिष मिश्रा शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास गुन्हे शाखा कार्यालयात हजर झाले होते. एसआयटीने आशिष मिश्रा यांना तीन डझनहून अधिक प्रश्न विचारले. यूपी पोलीस डीआयजी उपेंद्र कुशवाह यांनी सांगितले की, आशिष मिश्रा यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. त्यांना न्यायालयात हजर केले जाईल, असे उपेंद्र कुशवाह यांनी सांगितले.

राकेश टिकैत काय म्हणाले

आशिष मिश्रा यांच्या अटकेची मागणी विरोधक सातत्याने करत होते. शेतकरी नेते राकेश टिकेत यांनीही आशिषच्या अटकेची मागणी केली होती. दरम्यान, यूपी सरकारने या प्रकरणात पीडित पक्षाला कोणत्याही दबावाशिवाय न्याय देणार असल्याचं म्हटले होते. दरम्यान अटकेनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी म्हणाले की, आम्ही 12 तारखेला बैठक घेऊ. ते म्हणाले की आधी तुरुंगात जाऊ द्या, त्यानंतर ते कोणत्या विभागात पाठवत आहेत ते पाहू. राकेश टिकैत म्हणाले की, 15 तारखेला पुतळा जाळला जातो. त्यांच्या वडिलांचे (संजय मिश्रा) प्रकरण आहे. त्यांना निलंबित करत नाही. लखीमपूर हिंसाचारात 4 शेतकऱ्यांसह 8 जणांना आपला जीव गमवावा लागला. उत्तर प्रदेश सरकारने सर्व मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 45-45 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली होती. याशिवाय मृतांच्या कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरीही देण्यात येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी