लखीमपूर खेरी हिंसा: पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरी अन् 45 लाख रुपयांची नुकसान भरपाई

उत्तर प्रदेश सरकारने लखीमपूर खेरीमध्ये रविवारी झालेल्या हिंसाचारात मृत पावलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, सरकारी नोकऱ्या आणि न्यायालयीन चौकशी केली जाईल.

Lakhimpur Kheri Violence
लखीमपूर खेरी हिंसा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • लखमीपूरला भेट देणारे आणि आंदोलन करणाऱ्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
  • जिल्ह्यात कलम 144 लागू केल्यामुळे राजकीय पक्षांच्या नेत्यांना लखीमपूर खेरीला भेट देण्याची परवानगी नाही.
  • या घटनेतील दोषींना आठ दिवसांत अटक करणार असल्याचे पोलिसांनी दिलं आश्वासन

लखनऊ : उत्तर प्रदेश सरकारने लखीमपूर खेरीमध्ये रविवारी झालेल्या हिंसाचारात मृत पावलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, सरकारी नोकऱ्या आणि न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली आहे. एडीजी (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी सोमवारी सांगितले की, सरकार हिंसाचारात मारल्या गेलेल्या चार शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 45 लाख रुपयांची भरपाई आणि सरकारी नोकऱ्या देईल. तर जखमींना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

शेतकऱ्यांच्या तक्रारीवर एफआयआर नोंदवला जाईल आणि उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश या हिंसा प्रकरणाची चौकशी करतील. पोलीस अधिकारी म्हणाले की, जिल्ह्यात कलम 144 लागू केल्यामुळे राजकीय पक्षांच्या नेत्यांना लखीमपूर खेरीला भेट देण्याची परवानगी नाही. मात्र, शेतकरी संघटनांचे सदस्य येथे येऊ शकतात. या घटनेतील दोषींना आठ दिवसांत अटक करणार असल्याचे पोलिसांचे सांगितले आहे.
रविवारी झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला

रविवारी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य एका जाहीर सभेला संबोधित करणार होते पण त्यापूर्वी येथे हिंसाचार भडकला.  या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा तेनी यांचे पुत्र आशिष मिश्रा यांनी त्यांच्या वाहनाने शेतकऱ्यांना धडक दिल्याचा आरोप आहे.  त्याचबरोबर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी या हिंसाचारासाठी अतिरेकी आणि दहशतवाद्यांना जबाबदार धरले आहे. मिश्रा यांनी हिंसाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

विरोधकांचा योगी सरकारवर हल्ला

लखीमपूर हे राजकीय क्षेत्राचे केंद्र बनले आहे. विरोधी पक्ष योगी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. लखीमपूर खेरीला जाणाऱ्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांना सीतापूर येथील अतिथीगृहात ठेवण्यात आले आहे. अखिलेश यादव, जे लखनौमध्ये त्याच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करत होते, त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रगतिशील समाज पक्षाचे अध्यक्ष शिवपाल यादव लखीमपूर खेरीला जात होते, पोलिसांनी त्यांना वाटेत अडवले आणि ताब्यात घेतले.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी