लखीमपूर खेरी हिंसाचार: आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना SUV गाडीने चिरडल्याचा व्हिडिओ व्हायरल; प्रियंका गांधींनीही केला शेअर

त्तरप्रदेशच्या लखीमपूर खेरी जिल्ह्यातील हिंसाचारात शेतकऱ्यांचा मृत्यूवरुन राजकारण तापले आहे. शेतकऱ्यांना गाडीने चिरडण्याचा आरोप भाजप नेता आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलावर आहे.

 Video of agitating farmers being crushed by SUV goes viral
शेतकऱ्यांना SUV गाडीने चिरडल्याचा व्हिडिओ व्हायरल  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • लखीमपूर खेरीमधील हिंसाचारात चार शेतकऱयांसह आठ लोकांचा मृत्यू झाला आहे.
  • काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि आप नेते संजय सिंह यांनी या कारचा व्हिडिओ शेअर केला आहे.

लखनऊ:  उत्तरप्रदेशच्या लखीमपूर खेरी जिल्ह्यातील हिंसाचारात शेतकऱ्यांचा मृत्यूवरुन राजकारण तापले आहे. शेतकऱ्यांना गाडीने चिरडण्याचा आरोप भाजप नेता आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलावर आहे.  यावरुन देशातील राजकारण तापले आहे. उत्तरप्रदेश सरकारवर जोरदार टीका केली जात असून विरोधक हल्लाबोल करत आहेत. यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

घोषणाबाजी करणाऱ्या शेतकऱ्यांना SUV कार कसं चिरडून भरधावपणे निघून गेली हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. समोर गर्दी दिसत असतानाही वाहनचालकाने सर्रासपणे कार पुढे नेत शेतकऱयांना उडवलं. दरम्यान लखीमपूर खेरीमधील हिंसाचारात चार शेतकऱयांसह आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि आप नेते संजय सिंह यांनी या कारचा व्हिडिओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. दरम्यान कार कोण चालवत आहे याची पृष्टी या व्हिडीओमधून होत नाही.

25 सेंकदाच्या या व्हिडिओमध्ये शेतकरी गाडीला धडकल्यानंतर कसे फेकले जात आहेत हे दिसत आहे. तर काही शेतकरी गाडीच्या समोरुन बाजुला होण्याचा प्रयत्न करत आहेत. व्हिडिओमध्ये दोन गाड्या त्या रस्त्यावरुन जाताना दिसत आहेत. पहिली SUV कारने शेतकऱ्यांना चिरडलं, त्यानंतर एक दुसरी गाडी पहिल्या गाडीच्या मागून जाताना दिसत आहे. दरम्यान घटनास्थळावर प्रत्यक्षदर्शीने माध्यमांना सांगितलेल्या वर्णनानुसार हा व्हिडिओ समरुप दिसत आहे. 


ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी