कोर्टाचे मोठे निर्णय, दोन चर्चित चेहऱ्यांना जामीन

झारखंड उच्च न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना तर दिल्ली उच्च न्यायालयाने दीप सिद्धू याला जामीन दिला. हे दोन्ही निर्णय संबंधित उच्च न्यायालयांनी दिले.

Lalu Prasad Yadav and Deep Sidhu gets bail
कोर्टाचे मोठे निर्णय, दोन चर्चित चेहऱ्यांना जामीन 

थोडं पण कामाचं

  • कोर्टाचे मोठे निर्णय, दोन चर्चित चेहऱ्यांना जामीन
  • लालू प्रसाद यादव यांना जामीन, झारखंड उच्च न्यायालयाचा निर्णय
  • दीप सिद्धू याला जामीन, दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली: झारखंड उच्च न्यायालयाने चारा घोटाळा प्रकरणी राष्ट्रीय जनता दलचे नेता लालू प्रसाद यादव यांना जामीन दिला. तर दिल्ली उच्च न्यायालयाने प्रजासत्ताक दिनी दिल्लीत आणि लाल किल्ला येथे झालेल्या हिंसेप्रकरणी दीप सिद्धू याला जामीन दिला. Lalu Prasad Yadav and Deep Sidhu gets bail

लालू यादव एकेकाळी राजकारणातील चर्चित चेहरा होते. ते देशाचे रेल्वेमंत्री तसेच दीर्घकाळ बिहारचे मुख्यमंत्री होते. चारा घोटाळा प्रकरणात लालू यादव यांच्या विरोधात वेगवेगळे खटले दाखल झाले. यातील एका प्रकरणात त्यांना शिक्षा झाली तर अन्य एका प्रकरणाची सुनावणी सुरू असताना तब्येत खालावल्यामुळे ते काही काळ हॉस्पिटलमध्ये होते. जामीन मिळाल्यामुळे लालू यादव घरी परतणार आहेत. झारखंड उच्च न्यायालयाकडून लालूंना जामीन मिळाल्याचे कळताच यादव कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला. न्यायालयाकडून लालूंना न्याय मिळेल, असा विश्वास तेजस्वी यादव यांनी व्यक्त केला. 

जामिनावर असतानाच्या काळात लालूंना परदेशी जाण्यास मनाई आहे. त्यांना राहण्याची जागा आणि कोर्टासमोर जाहीर केलेला संपर्काचा मोबाइल क्रमांक हे दोन्ही बदलण्यास मनाई आहे. जामिनावर असताना कायद्याचे पालन करेन अशी ग्वाही दिल्यानंतर लालू यादव यांना झारखंड उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. 

लालू यादव ७२ वर्षांचे आहेत. ते डिसेंबर २०१७ पासून जेलमध्ये आहेत. जेलमध्ये असतानाचा दीर्घ काळ लालू झारखंडच्या रिम्स हॉस्पिटलमध्येच (Rajendra Institute of Medical Sciences hospital - RIMS Hospital) आहेत. मार्च २०१८ मध्ये लालूंना चारा घोटाळा प्रकरणातील एका खटल्यात १४ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली. सीबीआय कोर्टाने ही शिक्षा ठोठावली.

दीप सिद्धूला जामीन

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत आणि लाल किल्ला येथे झालेल्या हिंसेप्रकरणी आरोपी असलेल्या दीप सिद्धू याला दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन दिला. जामिनावर असताना कायद्याचे पालन करेन अशी ग्वाही दिल्यानंतर दीप सिद्धूला जामीन मिळाला. दीपला ३० हजार रुपयांचा बाँड आणि दोन जामीनदार देण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच त्याला पासपोर्ट जमा करण्याचा, दर पंधरा दिवसांनी हजेरी देण्याचा आणि तपास अधिकाऱ्यांनी बोलावल्यास चौकशीत सहकार्य करण्याचा आदेश देण्यात आला आहे. दीप सिद्धूला ९ फेब्रुवारी २०२१ रोजी अटक झाली होती. कृषी कायद्यांना विरोध म्हणून दीप सिद्धू याच्या नेतृत्वात प्रजासत्ताक दिनी दिल्लीत आणि लाल किल्ला येथे हिंसा झाली होती. या हिंसेत सार्वजनिक संपत्तीची प्रचंड हानी झाली होती. अनेक पोलीस जखमी झाले होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी